दिनांक ४ डिसेंबर, श्रीगोंदा:
दिल्लीच्या सीमेवर शेतकरी कायद्याच्या विरोधात चाललेल्या पंजाब, हरीयाणा व देशातील सर्व भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी संपूर्ण दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकून दिल्लीचा चक्काजाम केला आहे. या शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार न करता अश्रूधुर, लाठ्या व पाण्याचे फवारे मारून केंद्र सरकार आंदोलन मोडून काढण्यासाठी बळाचा वापर करत आहे. शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकून कायदा रद्द करावा व या आंदोलनाला श्रीगोंदा तालुका काँग्रेस समिती व जिल्हा युवक काँग्रेसचा पाठिंबा देत आज शुक्रवार दिनांक ४ डिसेंबर रोजी तालुका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन पाठिंबा जाहीर केला.

(नायब तहसीलदार) डॉ. योगिता ढोले यांना निवेदन देण्यात आले. (तालुकाध्यक्ष) दीपक पाटील भोसले, (जिल्हा युवकाध्यक्ष) स्मितल वाबळे, (माजी नगराध्यक्ष) मनोहर पोटे, (जिल्हा सहसचिव) ज्ञानदेव गवते, (माजी नगरसेवक) समीर बोरा, (नगरसेवक) सतिष मखरे, असिफभाई इनामदार, प्रशांत गोरे, (नगराध्यक्षा) शुभांगी ताई पोटे, (नगरसेविका) सीमाताई गोरे, (जिल्हा सरचिटणीस) बाळआप्पा पाचपुते, प्रशांत साबळे, योगेश मेहेत्रे, तुषार मोरे, (नगरसेवक) निस्सार बेपारी, (नगरसेविका) सोनाली घोडके, संतोष कोथिंबीरे, धीरज खेतमाळीस, जैद अत्तार, भापकर, मोरे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
स्रोत:(पत्रकार विजय उंडे)
