कारवाईच्या लेखी अश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन स्थगित..:अनिल घनवट

दिनांक ४ डिसेंबर, श्रीगोंदा/पुणे:

महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकर्‍यांची लूट थांबवावी या मागणीसाठी शेतकरी सघटनेचे धरणे आंदोलन सुरु होते. पणन सह संचालक विनायक कोकरे यांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, अनिल घनवट यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कडता, पोटली, पायली, अवाजवी हमाली, छुपी अडत वसूली, बोगस पावत्या, रोख पैसे दिल्यास बटावा रक्कम कापणे असे अनेक गैरप्रकार
सर्रास सुरु आहेत. प्रशासनाकडे तक्रार करूनही काही उपयोग नसल्यामुळे शेतकरी संघटनेने धरणे आंदोलन केले होते.

दिनांक ४ डिसेंबर रोजी पणन सह संचालक विनायक कोकरे यांनी जिल्हावार सर्व जिल्हा उपनिबंधक व बाजार समित्यांना दोषी आडते व कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. एक महिन्यात सर्व बाजार समित्यातील सर्व गैरव्यवहार तीस दिवसात बंद करण्याचे अश्वासन शेतकरी संघटनेला देण्यात आले. पणन संचालायालनाने दिलेले अश्वासन मान्य करुन संयाकाळी धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. पणन संचालकांनी दिलेल्या अश्वासना प्रमाणे बाजार समितीचे व्यवहार सुधारून शेतकर्‍यांची लूट बंद झाली नाही. तर, शेतकरी संघटना पुन्हा उग्र आंदोलन छेडेल असा इशारा दिला.

आंदोलनात सहभागी होण्यासाठी आज नाशिक, पुणे, अकोला, लातूर, हिंगोली, परभणी, अ.नगर या जिल्ह्यातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनाच्या समारोप प्रसंगी ललीत बहाळे, सीमा नरोडे, सतीश देशमुख, लक्ष्मिकांत कौठकर, शंकर पुरकर, अनिल चव्हाण, देविप्रसाद ढोबळे, अॅड. महेश गजेंद्र गडकर, सयाजी मोरे, दिपक शिर्के, प्रशांत पांडे आदी नेत्यांची भाषणे झाली. या आंदोलनास, स्वतंत्र भारत पक्ष, स्वर्ण भारत पार्टी व रयत क्रांती संघटना, शंभू सेनेने जाहीर पाठिंबा दिला होता.

स्रोत:(अनिल घनवट अध्यक्ष, शेतकरी संघटना)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading