एकाच जमिनीची तिनदा खरेदी, दलित वृद्ध महिलेस फसवून तहसीलदार व मंडळाधिकाऱ्यांकडून अधिकाराचा गैरवापर…

दिनांक ४ ऑगस्ट २०२५ श्रीगोंदा:

कोकणगाव (ता. श्रीगोंदा) येथील गट क्र. २०५ या जमिनीचा विक्रमी घोटाळा उघडकीस आला असून, एकाच जमिनीची तिनदा खरेदी करून, मूळ खरेदीदार असलेल्या दलित वृद्ध महिलेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात मुदगुल नावाचे तहसीलदार व मंडळाधिकारी आढळगाव यांची भूमिका संशयास्पद आहे.

कोकणगाव येथील गट क्र. २०५ मधील ८० आर क्षेत्र मीराबाई सुधाकर पवार (सध्या मुंबईत वास्तव्यास) यांनी सन १९९९ मध्ये दस्त नुसार बापू महादू शिंदे यांच्याकडून ५ लाख ५० हजार रुपये देऊन खरेदी केली होती. मात्र, त्यावेळी मुंबईत नोकरीस असल्यामुळे आणि पतीच्या निधनामुळे, तसेच अज्ञानामुळे जमिनीची नोंद लावणे राहून गेले.

सदर खरेदीची नोंद करण्यासाठी मीराबाई पवार यांनी १७ जानेवारी २०२५ रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयात अर्ज केला. या अर्जावर मंडळ अधिकारी आढळगाव यांनी ६ फेब्रुवारी २०२५ रोजी चौकशी सुरू केली आणि २८ एप्रिल २०२५ रोजी अहवाल सादर करत महसूल अधिनियम कलम १५० अंतर्गत “नोंदीस कोणतीही हरकत नाही” असा स्पष्ट निष्कर्ष दिला.

याच वेळी संबंधित मालक, पतसंस्था यांना नोटीस पाठवूनही कोणतीही हरकत दाखल झाली नाही.

मात्र तहसीलदार मुदगुल यांनी जाणूनबुजून नोंदीस विलंब लावला. या विलंबाचा गैरफायदा घेऊन, २६ मे २०२५ रोजी जमीन पुन्हा एकदा वेगळ्याच व्यक्तीस विकण्यात आली. विशेष म्हणजे, ही नोंद त्याच मंडळ अधिकाऱ्यांनी केली होती, ज्यांनी पूर्वी १९९९ च्या खरेदीला वैध मानले होते.

त्यानंतर, २५ जुलै २०२५ रोजी तिसऱ्यांदा दस्त नुसार पुन्हा एकदा तीच जमीन खरेदी दाखवण्यात आली – यावरून हा एक योजनाबद्ध फसवणूक प्रकार असल्याचे स्पष्ट होते.

या सगळ्या प्रकारातून, दलित वर्गातील वृद्ध मीराबाई सुधाकर पवार यांना न्याय मिळू नये, यासाठी तहसीलदार व मंडळाधिकाऱ्यांनी संगनमताने पोकळी निर्माण करून, पुन्हा खरेदी व्यवहारास संमती दिली, असा आरोप बहुजन समता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव सकट यांनी केला आहे.

त्यांनी या संदर्भात पुढील मागण्या केल्या:

  • मुदगुल तहसीलदार व आढळगाव मंडळ अधिकाऱ्यांवर फसवणूक व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९चे कलम ४ अंतर्गत गुन्हा दाखल करावा.
  • संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे.
  • मूळ खरेदीदारास न्याय देऊन जमिनीची मूळ नोंद त्वरीत लावावी.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Whatsapp -> https://link.meesho.co/AtEx2eZYeg (+919405270560)
Catalog Name:Diva Chic Mangalsutras
Base Metal: Alloy
Plating: Gold Plated
Stone Type: No Stone
Sizing: Non-Adjustable
Type: Mangalsutra Set
Net Quantity (N): 4
Sizes:Free Size
Dispatch: 2 Days

*Proof of Safe Delivery! Click to know on Safety Standards of Delivery Partners- https://ltl.sh/y_nZrAV3

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading