श्रीगोंद्यात साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी; लेझीम पथक, रथयात्रा आणि शेकडो महिलांची उपस्थिती विशेष आकर्षण..

दिनांक ३ ऑगस्ट २०२५श्रीगोंदा –

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०५ वी जयंती ससाणेनगर आणि सिद्धार्थनगरच्या वतीने अत्यंत जल्लोषात साजरी करण्यात आली. ३१ जुलै रोजी सायंकाळी १२:०० वाजता अण्णा भाऊंच्या प्रतिमेला हार अर्पण करून भव्य फटाक्यांच्या आतषबाजीने आणि १०५ तोफांची सलामी देऊन अभिवादन करण्यात आले.

सकाळी ध्वजारोहण व ग्रंथदिंडीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ध्वजारोहण माजी मंत्री बबनराव पाचपुते, शिवाजीराव नागवडे साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, माजी जि.प. अध्यक्ष बाबासाहेब भोस, नगराध्यक्ष मनोहर पोटे, तहसीलदार डोंगरे, एपीआय प्रभाकर निकम, psi संजय वाघमारे व विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले आणि विद्यार्थ्यांना शालेय वह्या व पुस्तके वाटप करत “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा संदेश देण्यात आला.

शहरातील मुख्य रस्त्यावरून भव्य अशी ‘लहू गर्जना’ लेझीम पथक, झांज पथकासह छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांसह भव्य रथयात्रा काढण्यात आली. दुपारी अन्नदानाचा कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला.

या भव्य कार्यक्रमाला आमदार विक्रम पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, बाळासाहेब नाहाटा, मुख्याधिकारी भगत मॅडम, बी.डी.ओ. फराटे मॅडम, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे अमर घोडके, कुणाल शिरवाळे, अविनाश आकाश घोडके, वृद्धेश्वर बँकेचे चेअरमन वाडगे साहेब, बाप्पू माने आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली.

सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्राच्या प्रसिद्ध गायिका गायत्री ताई यांच्या भव्य गायनाने हजारो महिलांना मंत्रमुग्ध केले.

या सर्व कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समिती ससाणे नगर – सिद्धार्थनगर यांच्या वतीने करण्यात आले. समितीचे नंदू ससाणे, संदीप उमाप, शिवा घोडके, अनिल ससाणे, नितीन ससाणे, लाला ससाणे, प्रा. संदीप ससाणे, किरण ससाणे, जय ससाणे, भाऊ ससाणे यांनी संयोजनाची धुरा सांभाळली. बौद्ध धम्म समिती, अपंग प्रहार संघटना व समाजाच्या सहकार्याने या कार्यक्रमाची शान अधिक वाढली.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading