राज्यात उजळले श्रीगोंद्याचे नाव.! एक्सलंट ऑलिंपियाड परीक्षेत मनस्वी साखरे पुन्हा राज्यात दुसरी..

दिनांक ३ ऑगस्ट २०२५,संगमनेर/श्रीगोंदा:

आज दिनांक ०३ ऑगस्ट २०२५ रोजी मालपाणी लॉन्स, पुणे-नाशिक महामार्ग, संगमनेर, जि. अहिल्यानगर येथे एक्सलंट ऑलिंपियाड परीक्षेतील राज्यस्तरीय यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात श्रीगोंदा तालुक्याचा अभिमान ठरलेल्या विद्यार्थ्यांनी राज्यपातळीवर घवघवीत यश संपादन करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

शिवाजीराव नागवडे डेफोडिल्स स्कूल, श्रीगोंदा येथील इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी मनस्वी मनोज साखरे हिने या परीक्षेमध्ये राज्यात दुसराजिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही मनस्वीने मंथन परीक्षेमध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकावून तिच्या अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडवले होते.

त्याचबरोबर इयत्ता दुसरीचे विद्यार्थी प्रसन्ना सूर्यभान गोलांडेअवंती अरुण पवार यांनी देखील आपल्या चमकदार कामगिरीतून राज्यात पहिला क्रमांक पटकावून विद्यालयाचे व श्रीगोंदा तालुक्याचे नाव उज्वल केले आहे.

या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, शाळा, पालकवर्ग व ग्रामस्थांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशाबद्दल विद्यालयाचे व्यवस्थापन, शिक्षकवृंद व मार्गदर्शकांचेही विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Advertise…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading