दिनांक ४ ऑगस्ट २०२५ श्रीगोंदा:
यवत (ता. दौंड) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई व्हावी. तसेच, या घटनेच्या निषेधार्थ आयोजलेल्या सभेत प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप आणि सभेच्या आयोजकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन संभाजी ब्रिगेड, समता परिषद व सकल मुस्लिम समाज यांच्या वतीने आज दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी तहसील कार्यालय, श्रीगोंदा येथे सादर करण्यात आले.

यावेळी निवेदनात राशीन (ता. कर्जत) येथील महात्मा फुले चौकाच्या नामफलकाची तोडफोड करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. समता परिषदेचे मुकुंद सोनटक्के यांनी सर्व ओबीसी समाजबांधवांसह या मागणीचे निवेदन दिले.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे यांनी यवत व राशीन येथील दोन्ही घटनांचा सविस्तर आढावा घेत गंभीर निषेध नोंदवला. यावेळी मुकुंद सोनटक्के, गोरख आळेकर, माजी डीवायएसपी कांतीलाल कोथिंबिरे, शिवाजी राऊत, नाना शिंदे, मौलाना आतार यांनीही तीव्र शब्दात आपला संताप व्यक्त केला.

कार्यक्रमास जमीर शेख, समीर काझी, तौसिफ ताडे, मुख्तार इनामदार, प्रशांत ससाने, अजिज शेख, मोविदिन आतार, तहसील शेख, सावता हिरवे, लक्ष्मण कोथिंबीर, योगेश म्हेत्रे, साजिद जकाते, वसीम ताडे, शहाजी खेतमाळीस, निवृत्ती खेतमाळीस, दिलीप लबडे, नानासाहेब कोथिंबिरे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)


Advertise…
