काष्टी येथील इसमाची सव्वा कोटींची फसवणूक..(राजेंद्र पाचपुतेनां पैसे देण्यास टाळाटाळ)..

काष्टी येथील इसमाची सव्वा कोटींची फसवणूक.

(राजेंद्र पाचपुतेनां पैसे देण्यास टाळाटाळ)..

दिनांक २० फेब्रुवारी,अहमदनगर:
मिळालेल्या माहितीनुसार गुंतवलेली रक्कम परत देण्यास टाळाटाळ करीत,५१ वर्षीय शेतकर्‍याची व अन्य गुंतवणुकदारांची फसवणुक केल्याची घटना नगर मार्केटयार्ड येथील पोखर्णा बिल्डींग मध्ये सण २०१२ ते २०१७ दरम्यान घडली आहे.
या विषयी मिळालेली माहिती अशी की,राजेंद्र काशिनाथ पाचपुते(रा.रेणुकानगर,केडगाव,मुळ रा.काष्टी,ता.श्रीगोंदा)यांनी रमेशचंद्र नायक, दिनेश नायक,परमानंद प्रजापती,दीपक गेहलोत,राकेश आर्य,दिनेश बुरीया,किसन मिरावत(पुर्ण नाव व पत्ते माहित नाही) यांच्या सांगण्यावरून तसेच जास्त व्याज मिळण्याच्या आमिषापोटी त्यांच्याकडे मुदतीवर पैशांची गुंतवणुक केली.मुदत संपल्यानंतर मात्र, पाचपुते यांनी आपले १ कोटी २७ लाख ६१ हजार ५०० रूपयेत परत मागितले परंतु,नमूद सर्वांनी रक्कम देण्यास टाळाटाळ करून फसवणुक केल्याचे पाचपुते यांनी नमूद केले आहे.
अशी फिर्याद पाचपुते यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिली.1याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भंगाळे हे करीत आहेत.
(वृत्तसंस्था)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading