राजेंद्र नागवडे यांनी खाजगी कारखाना काढून श्रीगोंदयातील शेतकऱ्यांना हवालदिल केले:- केशवभाऊ मगर

दिनांक १७ डिसेंबर,श्रीगोंदा:

आमदार बबनराव पाचपुते समर्थक व केशवभाऊ मगर यांची युती होऊन, शक्ती प्रदर्शन करत सहकार विकास पॅनलने अर्ज दाखल केले.

राजेंद्र नागवडे यांनी सहवीजनिर्मिती, डिस्टलरी, एफआरपी, बाबत दुर्लक्ष केल्याने भविष्यात सहकारी साखर कारखाना बंद पडेल आणि शेतकरी, सभासद यांनी या पापाचे भागीदार म्हणून, माझ्याकडे बोट दाखवू नये. म्हणून, मी नागवडे गटापासून दूर झालो.

त्यामुळे जिल्ह्यातील पारनेर, पाटस, जगदंबा, नगर साखर कारखान्या सारखी सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची अवस्था होऊ नये. यासाठी सहकार विकास पॅनलला विजयी करण्याचे आवाहन पॅनल प्रमुख (माजी व्हाईस चेअरमन) केशवभाऊ मगर यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आयोजित सभेत मार्गदर्शन करताना केले.

मगर पुढे म्हणाले की, स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांनी ४५ वर्ष सहकार टिकवण्यासाठी प्रयत्न केले. त्याची दखल राज्याने घेतली. पण, त्यांचे पुत्र राजेंद्र नागवडे यांनी खाजगी कारखाना काढून श्रीगोंदयातील शेतकऱ्यांना हवालदिल केले. कारखाना कायम आपल्या ताब्यात रहावा म्हणून, अनेक सभासद कमी केले. सेवा सोसायटी कमी केल्या. एफआरपी बाबत दिशाभूल केली. आजही गलथान कारभार सुरू आहे.

माजी व्हाईस चेअरमन भगवान आबा पाचपुते म्हणाले की, मी व मगर यांनी नागवडे गटाला कारखाना सत्ता मिळवून दिली. पण, त्यांनी मनमानी कारभार चालवला यात बदल झाला पाहिजे.असे त्यांनी नमूद केले.

जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी बोलताना सांगितले की, मला फोडण्यासाठी आमिषे दाखवली. पण, मी नागवडे यांनी परभणीचा कारखाना दिला तरी जाणार नाही.! मला चुकीच्या कारभारावर बोलतो म्हणून, अपात्र ठरवण्यासाठी धावपळ केली.

यावेळी भाजपा (तालुकाध्यक्ष) संदीप नागवडे यांनी आमदार बबनराव पाचपुते गटाची भूमिका नमूद केली. Rajendra Nagwade removes private factory and warns farmers in Shrigonda: – Keshavbhau Magar

आम्ही तडजोड करावी म्हणून नातेवाईक, जिल्ह्यातील नेते मंडळी शेवटी खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांच्या पर्यंत प्रयत्न केले जर आमचे आरोप बिनबुडाचे होते तर एवढी धावपळ कशासाठी असा सवाल केशव मगर यांनी उपस्थित केला.

स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading