दिनांक १७ डिसेंबर, श्रीगोंदा:
तालुक्यातील वीज भारनियमन (लोडशेडिंग) व कमी दाबाने वीज (लो- व्होल्टेज) हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ऊर्जा राज्यमंत्री ना. श्री. प्राजक्तदादा तनपुरे यांचे उपस्थितीत नुकत्याच पारपडलेल्या बैठकीत झालेल्या निर्णया प्रमाणे 50 MVA चा ट्रान्सफॉर्मर लोणी व्य॔कनाथ येथील 220 KVA सब-स्टेशन मध्ये दाखल झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशउपाध्यक्ष श्री.घनःशाम शेलार यांनी माध्यमांना दिली आहे.
श्रीगोंदा तालुक्यात वीजेचा प्रश्न गंभीर झाला असून, भारनियमन व कमी दाबाने वीज या समस्यांनी शेतकरी व वीज ग्राहक खुप हैराण झाला असल्याने, हा प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लावण्यासाठी लोणी व्य॔कनाथ येथील 220 KVA सब-स्टेशन वरून बेलवंडी, कोळगाव, चिंभळे, मढेवडगाव, पिंप्री कोलंदर व येळपणे ही सब-स्टेशन जोडण्याची मागणी आपण वेळो वेळी करून, त्याचा सतत पाठपुरावा केला.
ऊर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्तदादा तनपुरे यांचे अध्यक्षतेखाली बैठका घेण्यात आल्या. दिनांक २६ ऑक्टोबरला झालेल्या बैठकीत हे सहा सब-स्टेशन जोडण्याचा निर्णय झाला व त्यासाठी 50 MVA च्या दोन ट्रान्सफॉर्मरची अवशकता असून, पैकी एक ट्रान्सफॉर्मर तातडीने उपलब्ध करून, देण्याचे आदेश ना. तनपुरे यांनी या बैठकीत दिले होते. श्री. तनपुरे यांनी दिलेल्या आदेशा नंतर त्याबाबत आपण सातत्याने पाठपुराव करत राहीलो. त्याला यश येऊन हा 50 MVA चा ट्रान्सफॉर्मर काल दिनांक १६ डिसेंबर रोजी लोणी व्य॔कनाथ येथील सब-स्टेशन मध्ये पोहचला आहे.
Success for load shedding and follow-up on low-voltage issues.. Thanks to Energy Minister Ghanshyam Shelar ..
त्याचे जोडणीचे काम सुरू झाले असून, सुरूवातीला या सब-स्टेशनवरून ओव्हर लोड असणारे बेलवंडी, कोळगाव व येळपणे हे सब-स्टेशन जोडले जाणार आहेत. तर, या ट्रान्सफॉर्मरमुळे संपूर्ण तालुक्यात वीज प्रश्नी दिलासा मिळणार असून, या विषयी निर्णय घेऊन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्यमंत्री श्री. प्राजक्तदादा तनपुरे व सर्व अधिका-यांचे आभार मानले असल्याचे श्री. शेलार म्हणाले आहेत.
स्रोत:(प्रसिद्धीपत्र)
