विचित्र अवस्थेत आढळला पुरुषाचा मृतदेह.. मृतकाचे हातावर जय भिमचे गोंदण..!

दिनांक १७ डिसेंबर, श्रीगोंदा:

तालुक्यातील मढेवडगाव येथील अधिरा हॉटेल समोरील जंगल परिसरात एका ३० ते ३५ वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. मृत पुरुषाचे शरीर सुस्थितीत असून, शरीराचा जबडा कुरतडलेल्या अवस्थेत आहे. याबाबत काल सायंकाळी ६:०० वाजता स्थानिकांनी पोलीस पाटील हरिभाऊ हिरडे यांना फोन द्वारे माहिती दिल्यानंतर सदर घटना समोर आली आहे.

मढेवडगाव येथील स्थानिक रहिवासी राहुल साळवे यांनी याबाबत पोलिस पाटील हरिभाऊ हिरडे यांना माहिती दिली आहे. विचित्र अवस्थेमध्ये सदरील मृतदेह आढळून आल्याने परिसरात चर्चा पसरली. पोलीस हवालदार झुंजार व स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. मृतदेह दफन करण्यात आला असून, परिसरात याबाबत चौकशी करण्यात येत आहे. The body of a man was found in a strange condition in Shrigonda .. Jai Bhim’s tattoo on the hand of the deceased ..!

म्हातार पिंपरी येथील मजुरी काम करणारा एक इसम मागील सहा दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तर, त्या संबंधितांना मृत व्यक्तीचे कपडे व चप्पल ओळख पटवण्यासाठी दाखवण्यात आली आहे. याप्रकरणी (psi) माळी पुढील तपास करीत आहेत.

स्रोत:(आकस्मिक मृत्यू नोंद)

प्रतिकात्मक फोटोचा वापर करण्यात आला आहे…

Leave a Reply