खादी ग्रामोद्योगच्या अध्यक्षपदी सौ. ससाणे तर, उपाध्यक्षपदी शिंदे.

दिनांक १७ डिसेंबर, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुका सहकारी खादी ग्रामोद्योग संघाच्या अध्यक्षपदी सौ. संध्या विनायक ससाणे तर, उपाध्यक्षपदी संजय शिंदे यांची निवड झाली आहे. माजी अध्यक्ष शुभम घाडगे यांनी राजीनामा दिल्या मुळे रिक्त झालेल्या जागेवर सौ. ससाणे यांची निवड करण्यात आली.

एक महिन्यापासून या निवडीकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले होते. अध्यक्ष पदासाठी ससाने व बापू कसबे यांच्यामध्ये सरळ लढत झाली. यामध्ये कसबे यांना २ मतांनी पराभव स्वीकारावा लागला.

नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा, सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, पंचायत समिती सदस्य नानासाहेब ससाने, माजी अध्यक्ष अंकुश शिंदे, भगवानराव गोरखे, वसंतराव सकट, विनायक ससाने, मनोज घाडगे, राजू ससाने यांनी अभिनंदन केले आहे.

या निवड प्रक्रियेमध्ये खादी ग्रामउद्योग चे माजी चेअरमन भगवान गोरखे यांनी किंग मेकरची भूमिका बजावली.

स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)

Leave a Reply