दिनांक १५ डिसेंबर, श्रीगोंदा :
तहसील कार्यालयाच्या प्रांगणातुन वाहन पळवून नेणे आता नित्याचेच बनले आहे. अशातच भर दुपारी तहसील कार्यालयाच्या प्रांगणातुन दोन ट्रक वाळूतस्करांनी पळवून नेल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीगोंदा तहसील कार्यालयाच्या प्रांगनातून वाहने पळून नेने आता नित्याचेच बनले आहे. असे प्रकार मागे अनेकदा घडले असून, या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हे दाखल झाले आहेत.
तरीही मोठ्या धाडसाने वाळूतस्कर आपली वाहने पळून नेण्यात यशस्वी ठरत आहेत. असाच एक प्रकार काल दुपारी घडला असुन, तहसील कार्यालयाच्या प्रांगणातून वाळूतस्करांनी दिनांक६ नोव्हेंबर ते दिनांक १४ डिसेंबर रोजी दुपारी २:०० च्या दरम्यान तहसील कार्यालय श्रीगोंदा आवारातुन, ट्रक क्र. MH 12 CT 0967 चा मालक बिभीषण मारुती जाधव व MH 14 AS 8753 मालक दैवत मोहन जाधव दोन्ही रा. श्रीगोंदा यांनी दोन ट्रक तहसील कार्यालयाच्या सुमारे १० लाख किमतीच्या वाळू नसलेल्या मोकळ्या ट्रक आवारातून चोरून नेल्या आहेत.
याप्रकरणी सतीश भानुदास घोडेकर महसूल सहाय्यक तहसील कार्यालय यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भादवि कलम ३७९ व पर्यावरण कायदा कलम ३/१५ प्रमाणे मालक बिभीषण मारुती जाधव व मालक दैवत मोहन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर हे करत आहेत.
वाहने पळवली जातात कशी ?
श्रीगोंदा तहसीलदार मोठ्या धाडसाने कारवाई करत अनेक वाहने जेरबंद करत आहेत. मात्र, वाहने पळून जाण्याचे प्रकार अगदी नित्याचेच बनले आहे. त्यामुळे वाहने जप्त केल्यानंतरही ती तहसीलच्या आवारतून पळून जातात कशी? याचा शोध घेणे गरजेचे आहे. असे सर्वसामान्य नागरिकांचे मत आहे.
स्रोत:(फिर्याद)
