मी शिक्षिका झाले.पण,त्यांनी हे पाहिले नाही.असे म्हणताच सोनालीच्या अंतरमनातील वेदना आठवणीचा बांध फुटला. राम शिंदे..(शहीद दिनांक ६ एप्रिल २०१७,कामठी तालुका श्रीगोंदा)..

राम शिंदे

मुळगाव श्रीगोंदा तालुक्यातील कामठी ! मात्र महाराष्ट्राची राजधानी मुंबईत राम शिंदेचा जन्म झाला.लहानपणापासून क्रिकेट खेळणे आणि धावण्याचा छंद होता. वडील गिरणी कामगार वडीलांच्या पगारावर भागत नव्हते.आई भांडी कुंडीची कामे करायची आई वडीलांची कष्टाची लढाई थांबविण्यासाठी राम शिंदे मित्रा बरोबर गेला. अकरावीत असताना भारतीय सैन्य दलात भरती झाला व १४ वर्षांची सेवा झाली सुखी प्रपंच सुरू झाला. गावी परतत असताना झालेल्या रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला .

साहेबराव व सुमन शिंदे गावी दुष्काळ असल्याने मुंबईला पोट भरण्यासाठी गेले. त्यांच्या संसारात सचीन, राम व लक्ष्मण ही तीन पुष्य उमलली त्यामध्ये राम व लक्ष्मण ही जोडी आवळी जावळी राम लक्ष्मणचा जन्म दि २५ मे १९८२ रोजी झाला .राम ने अकरावी आय. टी. आय. केले. शिक्षण्याची मोठी इच्छा होती. परिस्थिती नव्हती. त्यामुळे अकरावीत असताना मित्र सतिश पानमंद सोबत कोपरगावला भरतीसाठी गेला. दि. १८ मार्च रोजी २००३ रोजी आर्मी एअर डिफेन्स या युनीट मध्ये भरती झाला. स्वताचे महाविद्यालयातील शिक्षण ही सुरू ठेवले. दि. ९ डिंसेबर २००९ रोजी भांबोरा येथील जयसिंगराव राजे भोसले यांची कन्या सोनाली हीच्या बरोबर विवाह झाला.

श्रेयस व श्लोक ही दोन मुल झाली. पत्नी सोनाली चे पुढील शिक्षण चालू ठेवले सोनालीला बी.ए. , बी.एड. केले. सोनाली शिक्षिका व्हावी खुप इच्छा होती.

आसाम राज्यात सेवा करीत असताना एक सुट्टीसाठी घरी येत असताना, श्रीपुर जवळ दि. ६ एप्रिल २०१७ रोजी अपघात झाला. या अपघातात राम शिंदे यांचा दुदैवी मृत्यू झाला. शिंदे परिवार व कामठी गाव शोकसागरात बुडाले. श्रीगोंदा येथील अमरधाम मध्ये राम शिंदेला लष्करी इतमामात शेवटचा निरोप दिला.आपल्या पतीच्या शवपेटीला सोनालीने खांदा दिला हा प्रसंग आठवला कि आजही अंगावर शहारे येतात.

राम शिंदे या जवानाचा मला सहवास लाभला माझे भाग्य समजते स्वभाव अतिशय मनमिळाऊ शांत होता. सेवा निवृत्तीनंतर त्यांनी फौजदार व्हायचे होते. त्यादृष्टीने ते अभ्यास करीत होते.मला शिकविले मी शिक्षिका म्हणून काम करावे म्हणून त्यांची इच्छा होती. मी शिक्षिका झाले पण त्यांनी हे पाहिले नाही असे म्हणताच सोनालीच्या अंतरमनातील वेदना आठवणीचा बांध फुटला.

माझे पती गिरणी कामगार त्यांच्या पगारावर तीन मुलांना मुंबईत शिकविणे मोठी कसरत होती त्यामुळे मी दुसऱ्याची भांडी कुंडी घासायची.माझे कष्ट बंद करायचे म्हणून राम सैन्यात भरती झाला. त्याने माझे कायमचे कष्ट बंद केले पण तो आज नाही याचे मनात सदैव दुख आहे . सुमन शिंदे वीरमाता

शब्दांकन: सुहास कुलकर्णी, अमोल उदमले (झी २४ तास)
स्रोत:(अग्निपंख फौंडेशन)

Leave a Reply