कारेगाव येथे महिलेला लुटणारा सराईत गुन्हेगार २४ तासांत गजाआड; रांजणगाव पोलिसांची धडक कारवाई, दुर्दैवी मृत्यूपूर्वी श्रीगोंदा येथील पीडितेची झाली होती लूट!

दिनांक २ जुलै २०२६, श्रीगोंदा:

कारेगाव परिसरात भंगार गोळा करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेला चाकूचा धाक दाखवून तब्बल ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या सराईत आरोपीला रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलिसांनी अवघ्या २४ तासांत जेरबंद केले आहे.

संगीता परमेश्वर शिंदे (रा. ढवळगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) २७ जून रोजी रात्री सुमारे ९ वाजता पीडित महिला कारेगाव येथून शिरूरच्या दिशेने जाण्यासाठी एका कारमध्ये लिफ्ट मागून बसली होती. कारमधील अनोळखी व्यक्तीने चाकूचा धाक दाखवत त्यांच्या गळ्यातील व कानातील सुमारे ८ ग्रॅम वजनाचे दागिने (किंमत रु. ८० हजार) जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि त्यांना शिरूर बायपास येथे सोडून तो पळून गेला.

या धक्कादायक घटनेनंतर संबंधित महिलेचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला, ज्यामुळे या प्रकरणाला अधिकच गंभीर वळण मिळाले होते. रांजणगाव पोलिसांनी संवेदनशीलतेने तपास करत अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक करून गुन्ह्याचा छडा लावला व मृत महिलेला न्याय मिळवून दिला.

स्रोत:(ऑनलाइन वृत्त)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading