श्रीगोंदा शहरात वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई; एका महिन्यात १५०० हून अधिक केसेस, साडेचौदा लाखांचा दंड वसूल!

दिनांक ३ जुलै २०२६,श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरातील वाहतूक कोंडी व बेशिस्त वाहनचालकांना चाप लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी जून महिन्यात धडक मोहीम राबवली.

दिनांक १ जून २०२६ ते ३० जून २०२६ या कालावधीत बस स्टँड, शनी चौक, कॉलेज परिसर आणि इतर गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी विशेष मोहीम राबवून तब्बल १५०० हून अधिक केसेस केल्या आहेत. या कारवाईत वाहनचालकांकडून लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी या कारवाई करण्यात आलेल्या आहेत.

दारू पिऊन धोकादायकरीत्या वाहन चालवणाऱ्या ०६ चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ०४ वाहनचालकांवर केसेस करून त्यांचे खटले थेट न्यायालयात पाठवण्यात आले आहेत.

कॉलेज परिसर तसेच बस स्टँड परिसरात विनाकारण फिरणाऱ्या आणि मुलींची छेड काढणाऱ्या टार्गेट मुलांवर पोलिसांनी कडक नजर ठेवत ०६ केसेस केल्या आहेत.

विदाऊट नंबर प्लेट, ट्रिपल सीट दुचाकी चालवणे, विना परवाना (लायसन्स) वाहन चालवणे, नो पार्किंगमध्ये गाडी लावणे आणि फॅन्सी नंबर प्लेट वापरणे अशा विविध कलमांखाली ई-चलन मशीनद्वारे तब्बल १,५३९ केसेस करण्यात आल्या आहेत.

या संपूर्ण मोहिमेदरम्यान पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून एकूण १४,५२,८०० रुपये (चौदा लाख बावन हजार आठशे रुपये) इतका मोठा दंड वसूल केला आहे.

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. लायसन्स, गाड्यांची कागदपत्रे सोबत ठेवावीत आणि नंबर प्लेट नियमानुसारच असाव्यात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading