जुगारीच्या नावाखाली केलेल्या कारवाईत ९ जणांकडून काढले १ लाख ४५ हजार रुपये.. मात्र, प्रत्यक्षात १० हजार १०० रुपयांचीच गुन्ह्यात नोंद…बाकी रक्कम गेली कुठे.??
दिनांक २४ मे,श्रीगोंदा:
शहरातील हॉटेल सिध्दी येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पो.कॉ. मिसाळ व पो.कॉ. वेठेकर यांचे पथकाने दिनांक २० मे रोजी बोगस धाड दाखवत, आमचे खिशातील रोख रकमा काढून घेऊन, तुम्ही जुगार खेळत असल्याचा तुमच्यावर गुन्हा दाखल होणार असून,त्या गुन्ह्यात तुमच्याकडील मोबाईल आणि गाड्या न दाखविणेसाठी प्रत्येकी दहा हजार रुपयांची मागणी केली. असा आरोप दिनांक २३ मे रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
सदरील निवेदन मच्छिन्द्र सुद्रीक,संतोष बोळगे, शरद गांजुरे यांनी जिल्हा पोलीस प्रशासनास सादर केले असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या अश्या डुप्लिकेट कारवयांना साधारण माणसे सर्रास बळी पडत आहेत. खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत, लाखोंचा गंडा पोलीसच घालत असल्याच्या अनेक घटना यापूर्वी तालुक्यात घडल्या आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष घालावे व नमूद बोगस कारवाई संदर्भात सविस्तर चौकशी करावी.यासाठी निवेदन देण्यात आल्याचे या गुन्ह्यात ओवण्यात आलेल्या पीडितांचे म्हणणे आहे.वारंवार नमूद पोलीस कर्मचारी तालुक्यात वाळू, जुगार, मटका, दारू, अश्या अवैद्य धंद्यावाल्यानां हेरत कारवाईची धमकी देऊन, स्वहित साधत असल्याचे अनेकांनी आरोप केले असून, काहींनी यापूर्वी ही जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलनही केल्याचे सर्वश्रुत आहे.
अश्याच प्रकारे शहरातील सिद्धी हॉटेलवर हॉटेलच्या व्यवहारासाठी जमलेल्या मालक, चालक, मध्यस्थी आणि कर्मचारी तसेच त्यांच्या समवेत आलेल्या इसमांना लक्ष बनूउन, दिनांक २० मे रोजी नमूद जमलेल्यापैकी चारजण करमणुक म्हणून पत्त्याचा रमी हा मनोरंजनाचा खेळ विना पैशाचा खेळत असताना, अचानकपणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने धाड टाकुन,तुम्ही जुगार खेळता असल्याची आम्हांला खबर मिळाली आहे. असे सांगत सगळ्यांना एका खोलीत जमविले. त्यानंतर एकेकाची अंग झडती घेऊन, प्रत्येकाच्या खिशातील रक्कम काढून, त्या खोलीतील पत्त्यावरती टाकुन फोटो काढून घेतले. त्यानंतर सर्वांना एकाच गाडीत बळजबरीने बसवुन, श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आणले व श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तिरट नावाचा जुगार खेळत असल्याचा गुन्हा दाखल केला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
प्रत्येक्षात जे घडलेच नाही.त्याचा विपर्यास करून ९ जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करून प्रत्येकाच्या खिशातून जमा केलेली १ लाख ४५ हजार रुपये रक्कम नमूद न करता,फिर्यादीत किंवा सरकारी दफ्तरी फक्त १० हजार १०० रुपये नोंद करण्यात आल्याचे, अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना मच्छिन्द्र सुद्रीक, बोळगे आणि गांजुरे यांनी हकीकत सांगितली. यावर वरिष्ठांकडे लेखी तक्रार करा असे त्यांनी सांगितले. त्यानुसार दिनांक २३ मे रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक सिंग यांना याप्रकरणी सखोल चौकशीसाठी निवेदन सादर केले असल्याचे सुद्रीक यांनी माध्यमांना प्रसिद्धीस दिले आहे.
