दिनांक २४ मे श्रीगोंदा:
दोन दिवसांपासून श्रीगोंद्यात चर्चेचा विषय बनलेल्या बाबासाहेब भोस आणि पोलीस इन्स्पेक्टर यांच्या वादावर आज पडदा पडला ! पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या विषयी अक्षेपार्ह आणि अश्लील भाषा वापरत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी पोलिसांचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यांच्या तोंडून गेलेल्या चुकीच्या शब्दांच भांडवल करत, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिनांक २२ मे रोजी भोस यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.
याप्रकरणी पोलीस नाईक संदीप पितळे यांच्या फोनवर संभाषण करत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार व बाबासाहेब भोस यांनी पितळेनां शेलार यांच्या संबंधितांच्या हॉटेलवर झालेल्या कारवाई संदर्भात विचारपूस केली होती.कारवाई हॉटेलमध्ये झाली नसून, हॉटेलच्या बाहेर झाली असताना, पोलिसांनी पत्रकारांना चुकीची माहिती दिली. त्या माहितीत त्या हॉटेलचा नामोल्लेख झाल्याने,सदरील प्रकरण ऐरणीवर आले.
याविषयी पितळे यांच्याशी बोलत असतांना बाबासाहेब भोस यांच्या शब्दांचा तोल सुटला आणि त्यांनी पितळे यांच्या फोनवर पोलीस निरीक्षक यांना अश्लील आणि अर्वाच्च भाषा वापरली.तशेच, पोलिस प्रशासनावर दडपशाही निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा पोलिसांनी आरोपही केला.
दोन दिवस या प्रकरणाने शहरासह तालुक्यात चर्चेला उधाण आले होते. बाबासाहेब भोस यांनी पोलिसांना लॉकडाऊन कालखंडात केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा लवकरच सर्वांसमोर मांडणार असल्याचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने आज दिनांक २४ मे रोजी बाबासाहेब भोस यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र, या परिषदेच्या आधी पोलीस अधिकारी आणि बाबासाहेब भोस सह त्यांचे समर्थक यांच्यात चर्चा झाली आणि या चर्चेचे फलित पोलीस नाईक पितळे यांची आजच्या आज तात्काळ बदली करीत, या प्रकरणावर पडदा पडला आहे.
प्रकरण मिटल्यानंतर दोन्हीही बाजूने दिलगिरी व्यक्त करण्यात आली असून, पितळे यांची आज बदली करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतल्याची, माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी अनेक विषयांना हात घातला. पोलीस नाईक पितळे निर्दोष असतांना, त्यांची बदली करणे गैर संविधानिक व अन्याय कारक आहे. यावर सातव यांनी पितळेनीं क्लिप व्हायरल करायला नको होती. त्यांनी गडबड केली, विचार करण्यास वेळ दिला नाही, तसेच त्यांच्यावर कार्यक्षेत्रात चुकीच्या पद्धतीने काम करत असल्याचे अनेक आरोप आहेत. त्यामुळे त्यांची बदली करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यानंतर बाबासाहेब भोस यांनी लॉकडावून कालखंडामध्ये तहसील व पोलीस प्रशासनाचे चाललेले कामकाज चुकीचा पध्दतीचे असून, ते उजेडात आणणार असल्याचा इशारा दिला होता. या भीतीपोटी आपण सदर प्रकरण मिटवले किंवा थांबवले आहे का ? असे पत्रकारांनी विचारल्यावर डीवायएसपी सातव यांनी लॉक डाऊन कालखंड आहे, सर्वत्र वातावरण कोरोणामय असताना, महत्त्वाच्या घटनेकडे लक्ष देणे गरजेचे असून, सर्वांनी कार्यक्षेत्रात शांतता ठेवावी असे सांगितले.
नमूद प्रकरनात पोलीस नाईक पितळे यांच्या कार्यक्षेत्राचा विषय असल्याने, त्यांचा आलेल्या फोन पुरता संबंध होता. परंतु, त्यांना सबंध प्रकरणात दोषी धरत, पोलिसांनी कारवाई करीत, तडकाफडकी बदली करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यामागे भोस यांचा आग्रह असल्याचेही समजते आहे. शिवाय पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव साहेब प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी भोस यांच्या समर्थकांसह संबंधित नेत्याच्या घरी चर्चेसाठी बसल्याचे समजते आहे.
या सर्व विषयांबरोबर यामध्ये जात फॅक्टर हाही महत्त्वाचा विषय असल्याचे बोलले जात आहे. कारण, सबंध प्रकरणांमध्ये फिर्यादी वगळता फिर्याद दाखल करायला लावणारे अधिकारी, आरोप करणारे अधिकारी, राजकिय पदाधिकारी आणि हे सगळं प्रकरण मिटवणारे वरिष्ठ अधिकारी हे सर्व एकाच समाजाचे असल्याने, पितळे उपेक्षित राहत त्यांचा या प्रकरणात बदली स्वरूपात बळी गेल्याची सर्वत्र चर्चा आहे.
याप्रकरणी पितळे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली आहे.पोलीस अधीक्षक अखिलेश सिंग यांनी नमूद प्रकरणात लक्ष घालून सामान्य पोलीस कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या दडपशाही ची दखल घ्यावी. अशी मागणी जाणकार करीत असल्याचे समोर येत आहे.
