महादजी शिंदे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे नवोदय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश..

दिनांक २३ जून,श्रीगोंदा:

रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा येथील संकुलातील महादजी शिंदे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. केंद्रीय पाठ्यक्रम अंतर्गत केंद्र सरकारने सुरू केलेल्या जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये प्रवेशासाठी राज्य स्तरावर परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेच्या माध्यमातून गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश दिला जातो. नुकत्याच जानेवारी २०२० मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये महादजी शिंदे विद्यालयाचे ४२ विद्यार्थी बसले होते.

अतिशय उच्च काठिण्यपातळी असलेल्या या परीक्षेमध्ये शहरी भागातील जिल्ह्यातील एकूण सात पात्र विद्यार्थी झाले. त्यापैकी २ विद्यार्थी महादजी शिंदे विद्यालयाचे आहेत. तन्मय प्रदीप पाडळे, यशराज संतोष उबाळे या दोन विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड झाली.

विभाग प्रमुख श्रीमती सोनाली मचाले, सौ. युगंधरा पाडळे, श्री. लक्ष्मीकांत खेडकर, गुणवत्ता विभाग प्रमुख सुधिर साबळे, गुरुकुल प्रमुख विलास लबडे या शिक्षकांचे तसेच विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम कन्हेरकर, उपप्राचार्य बाळासाहेब जाधव, पर्यवेक्षक उत्तम बुधवंत यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन स्थानिक स्कूल कमिटीचे बाबासाहेब भोस, तुकाराम दरेकर, रविशेठ दंडनाईक आणि शहरातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.

(स्रोत:महादजी शिंदे विद्यालय,श्रीगोंदा.)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading