दिनांक २७ मे (श्रीगोंदा कारखाना,श्रीगोंदा):
दिनांक २५ मे रोजी श्रीगोंदा फॅक्टरीत घोरपडी, पुणे येथून आलेला एक इसम कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याच्या संपर्कात आलेल्या १४ जणांचे घशाचे स्त्राव नमुने जिल्हा ग्रामीण रुग्णालयात तपासण्यात आले होते. साधारण ९ वयस्क व ५ बालके अश्या १४ जणांचा अहवाल आज संध्याकाळी प्राप्त झाला असून, सुदैवाने सर्व जण निगेटिव आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन खामकर यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे.
तालुक्यांमध्ये बाहेर गावांहून येणाऱ्या लोकांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, कोरोणाचे रुग्ण निदर्शनास येऊ लागले आहेत. अश्या लोकांशी प्रवासा दरम्यान किंवा वास्तव्या दरम्यान संपर्क आलेल्या लोकांना स्थानिक प्रशासन जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवत आहे. यातच कारखाना येथील सर्वांचे अहवाल आज निगेटिव्ह आल्याने, परिसरातील सर्वांनी समाधानाचा निश्वास टाकला आहे.
नमूद प्रकरणी दोन दिवसांपासून सामाजिक माध्यमांवर भरपूर प्रमाणात आफवांचे पेव फुटल्याचे निदर्शनास आले. निगेटिव, पॉझिटिव्ह बरोबर रुग्णाच्या प्रकृती संदर्भात आक्षेपार्ह न्यूज सोशल मीडिया वरून प्रसारित होत असल्याचे अनेकांकडून बोलले गेले. श्रीगोंदा फॅक्टरी परिसरात अश्या पध्दतीने गैरसमज पसरवणारे मेसेज आल्याचे स्थानिकांकडून समजले. डॉक्टर नितीन खामकर यांनी श्रीगोंदा कारखाना येथील कोरोणा पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १४ जणांचे अहवाल आज निगेटिव्ह आल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.
कोणत्याही प्रकारच्या कोरोना संदर्भातील अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये. शासनाचे निर्देश तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. जर, कोणी कोरोना प्रादुर्भावा संदर्भात चुकीची किंवा अक्षेपार्ह माहिती प्रसारित करून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असेल. तर, अशा इसमांवर स्थानिक प्रशासन कारवाई करणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे सामाजिक माध्यमांचा वापर सद सद विवेकबुद्धी जागृत ठेवून करणे गरजेचे आहे. अन्यथा जेल वारी घडू शकते.
