दिनांक २७ मे,श्रीगोंदा:
सध्याची परिस्थिती ही शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय बिकट बनलेली आहे. आज सध्या एकीकडे शेतकऱ्यांच्या काद्याला योग्य भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची परस्थिती अत्यंत खालावलेली आहे. शेतकरी शेतात खुप कष्ट करून, देखील त्याला त्याची कष्टाची भाकरी सुध्दा मिळत नाही. दुसरीकडे जनावरे कशी सांभाळावी हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे आर्थिक चलन सुरळीतपणे चालवणाऱ्या गायी, म्हशी यांच्या दुधात देखील घट झालेली आहे.
सध्याचा म्हैस दुध दर हा ३४ ते ३६ रुपये आहे. आणि गायी च्या दुधाचा दर हा २० ते २२ रूपये आहे. दिवसभर राबराबुन देखील शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळत नाही. कमी दरात दुध विकावे लागत आहे. तर, दुसरीकडे पशु आहारात झपाट्याने वाढ होत आहे. आज सध्या परिस्थिती पाहता सर्व बाजूंनी शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. या शेतकऱ्यांना कशाप्रकारे संकटातून बाहेर पडावे हे समजेना झाले आहे. तरी दुध दरात वाढ करून या शेतकऱ्यांच्या कष्टाचा मोबदला योग्यरीत्या मिळावा अशी मागणी दुध उत्पादक शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
सध्या वैरणीचा व त्याचबरोबर चाऱ्याचा तुटवडा चालू असताना, देखील दुध दरात काय वाढ होत नाही. दुसरीकडे पशुखाद्य आहारात मात्र, झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. यामुळे एक तर दुधाचे दर वाढवा, अन्यथा पशुखाद्याचे तर दर कमी करा. अशी मागणी प्रहारचे युवक तालुकाध्यक्ष अशोक माळशिकारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे निवेदन ई-मेल च्या माध्यमातून पाठवले आहे.
