दिनांक ३ मार्च,श्रीगोंदा:
मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत श्रीगोंदा टाकळी कडेवळीत रस्ता निकृष्ट दर्जाचे सील कोट झाल्याबाबत,श्रीगोंदा नगरपरिषद रोड ते साळवण देवी मंदिर या एक किलोमीटरच्या अंतरामध्ये सील कोट नित्कृष्ट दर्जाचे झालेले आहे.
या ठिकाणी रस्त्यावरील सेन,माती न काढता सील कोट करण्यात आलेले आहे.दर्जेदार सीलकोट करावा, रोडवरील साईट पट्टीला मुरूम लवकरात लवकर टाकण्यात यावा, या रोडवर सूचनाफलक लावावेत तसेच काही ठिकाणी रस्ता क्रॉसिंग करताना त्याठिकाणी सिमेंट नळी टाकाव्यात.या मागण्यांचे निवेदन श्रीगोंद्याच्या नायब तहसीलदार मॅडम यांना देण्यात आले आहे.
या ठेकेदाराने शासकीय अधिकारी रस्त्यावर नसताना ज्यावेळी डांबरीचे काम झाले,त्यावेळेस कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांना न सांगता आपल्याच मनाने सर्व कामे केली आहेत. कामाच्या दर्जाबाबत चौकशी व्हावी व झालेला एक किलो मीटर मधील निकृष्ट सील कोट पुन्हा करण्यात यावा.हे काम दिनांक ९ मार्च पर्यंत पूर्ण करावे. अन्यथा दिनांक १७ मार्च सकाळी ११ वाजता श्रीगोंदा तहसील कार्यालया समोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
नमूद निवेदन देतांना संभाजी ब्रिगेड चे अरविंद कापसे,नाना शिंदे,नानासाहेब कोथिंबीरे सह सहकारी उपस्थित होते.
