श्रीगोंदा बाजार समितीचे प्रमुख बाजार आवारावर सोमवार ०२ मार्च रोजी ३००० कांदा गोण्याची आवक झालेली आहे. त्यामध्ये नंबर १ कांदयास रुपये १८०० ते २१०० भाव मिळाला असुन,नंबर २ कांदयास रुपये १२०० ते १८०० व नंबर 3 कांदयास रुपये ७०० ते १२०० भाव मिळाला आहे.
या लिलावावेळी बाजार समितीचे उपसभापती वैभवदादा पाचपुते उपस्थित होते. यावेळी संचालक वागस्कर, उमेशशेठ पोटे बाजार समितीचे सचिव डेबरे साहेब, संपतराव शिर्के साहेब व इतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच कांदा व्यापारी हमीद शेठ हावलदार, संजय लगड, डॉ. जाधव, अरुण गायकवाड, दत्तात्रय पवार, काकासाहेब गायकवाड, महाळा भिसे, प्रशांत जाधव व मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते. शेतक-यांनी सदरच्या बाजार भावा बाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी बाजार समितीचे उपसभापती वैभवदादा पाचपुते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आवाहन केले की,कांदा या शेतीमालाला बाजार आवारामध्ये चांगला भाव देण्याचा नेहमीच प्रयत्न करीत आहे. त्यामुळे शेतक-यांनी कांद्याची योग्य ती प्रतवारी करुन बाजार समिती श्रीगोंदा, उपबाजार आवार चिंभळे येथे कांदा विक्रीसाठी आणावा असे जाहिर आवाहन केले.