दिनांक ४ नोव्हेंबर २०२४, श्रीगोंदा:
आज श्रीगोंदा तहसील कार्यालयात निवडणूक प्रक्रियेचा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला, जिथे काही उमेदवारांनी त्यांच्या उमेदवारीतून माघार घेतली. स्थानिक निवडणूक निर्णय अधिकारी गौर सावंत व सहाय्यक निवडणूक अधिकारी क्षितिजा वाघमारे यांच्या समोर एकूण १५ उमेदवारांनी त्यांचे अर्ज माघारी घेतले.

यामध्ये पृथ्वीराज राजेंद्र नागवडे, राजेंद्र शिवाजीराव नागवडे, अनंता भुजंगराव पवार, पांडुरंग नारायण खेतमाळीस, अरविंद बाळकृष्ण कारंजकर, निलेश संभाजी नवले, वंदना मनोज इथापे, प्रनोती राहुल जगताप, ऋषिकेश अण्णासाहेब शेलार, निवास श्रीधर नाईक, टिळक गोपीनाथ भोस, अजित बबन भोसले, घनश्याम प्रतापराव शेलार, निलेश नंदू गायकवाड आणि प्रतिभा बबनराव पाचपुते यांचा समावेश आहे.
श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीचे प्रमुख उमेदवार व त्यांचे चिन्ह
२२६ श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी करत असलेल्या प्रमुख उमेदवारांची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने या उमेदवारांना त्यांचे अधिकृत चिन्ह प्रदान केले आहे, ज्याद्वारे मतदारांना त्यांची ओळख पटविण्यात येईल. या यादीत विविध पक्षांचे उमेदवार, तसेच काही अपक्ष उमेदवारही आहेत.

अनुराधा राजेंद्र नागवडे – शिवसेना उबाठा (मशाल)
विक्रम बबनराव पाचपुते – भारतीय जनता पार्टी (कमळ)
महेंद्र दादासाहेब शिंदे – बहुजन समाज पार्टी (हत्ती)
संजय हनुमंत शेळके – महाराष्ट्र नवनिर्माण सेना (रेल्वे इंजिन)
अण्णासाहेब सिताराम शेलार – वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर)
गोरख दशरथ आळेकर – जनहित लोकशाही पार्टी (हिरा)
दादा बबन कचरे – राष्ट्रीय समाज पक्ष (शिट्टी)
विनोद साहेबराव साळवे – सैनिक समाज पक्ष (ट्रंपेट)
अनिल काशिनाथ कोकाटे – अपक्ष (चिमणी)
राहुल कुंडलिकराव जगताप – अपक्ष (रोड रोलर)
दत्तात्रय आप्पा वाघमोडे – अपक्ष (ऑटो रिक्षा)
नौशाद मुंशीलाल शेख – अपक्ष (किटली)
रत्नमाला शिवाजी ठुबे – अपक्ष (ऊस शेतकरी)
राहुल संजय छत्तीसे – अपक्ष (खाट)
सागर रतन कासार – अपक्ष (वाळूचे घड्याळ)
सुवर्णा सचिन पाचपुते – अपक्ष (प्रेशर कुकर)
स्रोत:(अधिकृत माहिती)




