श्रीगोंद्यातील रोहित लोखंडे याने जिंकले गुजरातकरांच मन.. एका अल्पवयीन मुलीवर होणारा अत्याचार थांबावला..!

दिनांक ६ एप्रिल २०२५, श्रीगोंदा/गुजरात:

रोहित सुरतला फिरायला गेला असता मध्यरात्री पुना पाटीया परिसरात काही गैराट मद्यधुंद युवक एका अल्पवयीन मुलीशी छेडछाडी आणि लैंगिक अत्याचार करत होते. हे पाहताच रोहितने तिथे जाऊन त्यांच्याशी  झटापट करत त्या मुलीची सुटका केली.

तसेच मदतीसाठी अरडाओरडा करत सुरत पोलिसांच्या सहाय्याने पीडित मुलीची इज्जत वाचवली. रोहितच्या या कार्याचं गुजरात येथील नागरिकांसह श्रीगोंदेकरही कौतुक करत आहेत.

या सगळ्या प्रकरणाचे चित्रीकरण येथे असलेल्या एका सिसीटिव्हीमध्ये कैद झालेले पाहून नमूद दोन्ही आरोपी फरार झालेले आहेत. रोहितचे हे धाडस ऐकून एकविरा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री.गजेंद्रजी पाटील व सुरत पोलिसचे सब इन्स्पेक्टर यांनी त्याचं कौतुक करत शाल श्रीफळ देऊन सत्कार केला आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Advertise..

रोहितचा सन्मान

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading