RPI (आठवले) गटाची तालुका कार्यकारणी जाहीर..

दिनांक २३ जून,श्रीगोंदा:

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या आदेशानुसार श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप व शहराध्यक्ष विशाल घोडके यांनी आज दिनांक २३ जून रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, सिद्धार्थनगर, श्रीगोंदा येथे झालेल्या बैठकीत श्रीगोंदा तालुका कार्यकारणी जाहीर केली.

https://bit.ly/bspmycityshrigonda

यामध्ये पप्पूभाऊ दिलीप घोडके यांची तालुकाउपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तसेच, जॉन राजू घोडके यांची युवक तालुकाध्यक्ष आणि संदीप लक्ष्मण ससाणे यांची युवक तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

यावेळी आनंद घोडके, तृषाल ससाने, विशाल घोडके, सागर मोरे, अक्षय जाधव, भूषण घाडगे, ऋतिक घोडके, कुमार घोडके, सतीश ससाणे, तुषार जगताप, सागर काळे, मयूर घोडके, नागेश घोडके, श्याम घोडके, योगेश घोडके, प्रतिक घोडके, सागर शिंदे, उमेश ससाने, निखिल ससाने आदि आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सामाजिक कार्यकर्त्यांकडून स्वागत करीत, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. RPI (Athavale) group’s taluka executive announced.

स्रोत:(प्रसिद्धीपत्र)

Leave a Reply