सदाशिव पाचपुते उर्फ अण्णा यांचे कोरोना उपचारा दरम्यान दुःखद निधन..

दिनांक १९ फेब्रुवारी (काष्टी,श्रीगोंदा):

सदाशिव भिकाजी पाचपुते उर्फ अण्णा यांचे रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये कोरोणा उपचारादरम्यान निधन झाले आहे. ते ६५ वर्षांचे होते.

बबनराव पाचपुते यांचे बंधू व राजकीय भूमिकेत त्यांना पाठबळ निर्माण करणारे सावलीप्रमाणे बरोबर असणारे भाऊ सदाशिव अण्णा पाचपुते यांचे आज निधन झाल्याची वार्ता वाऱ्याप्रमाणे सर्वत्र पसरली आहे. सामाजिक माध्यमातून अण्णावर प्रेम असणाऱ्या चाहत्यांनी व कार्यकर्त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये बबनराव पाचपुतेंचे वलय निर्माण करण्यामध्ये अण्णांचा सिंहाचा वाटा होता. राजकीय भूमिकेमध्ये सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचत त्यांनी पाचपुते कुटुंबीयांविषयी तालुक्यात एक वेगळी छवी निर्माण केली होती. त्यांच्या जाण्याने तालुका सह राजकीय-सामाजिक क्षेत्रांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

स्त्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)..

बहुजन समता पत्र कडून अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली…💐

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading