#श्रीगोंदा..चोरी करणाऱ्या महीलांकडुन दोन लाख पन्नास हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत, श्रीगोंदा तपास पथकाची कामगिरी..

दिनांक १९ फेब्रुवारी, श्रीगोंदा:

दिनांक ५ जानेवारी रोजी फिर्यादी महीला सौ. सविता दादासाहेब क्षीरसागर यांनी फिर्याद दिली की, दिनांक ४ जानेवारी रोजी दुपारी ३:४० वा.चे सुमा.श्रीगोंदा बस स्टॅण्डवर श्रीगोंदा ते जामखेड बसमध्ये चढत असताना, कोणीतरी अज्ञात चोरट्याने माझे पर्समधील पाकीटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरल्याचे फिर्यादीवरुन श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये भा.द.वि.क. ३७९ प्रमाणे गुन्हा रजिष्टरी दाखल करण्यात आला.या प्रकरणाचा तपास स.पो.नि.दिलीप तेजनकर यांचकडे देण्यात आला होता.

https://bit.ly/bspmycityshrigonda

बसस्थानक परिसरातील चोऱ्यांच्या प्रकारांना आळा बसावा म्हणुन, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी श्रीगोंदा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी कर्मचारी यांना बसस्थानक, बाजारपरिसर, गर्दीच्या ठिकाणी पेट्रोलिंग करणेबाबत सुचना दिल्या.त्यानुसार दिनांक २ फेब्रुवारी रोजी पेट्रोलिंग दरम्यान दोन संशयित महीला गर्दीत महीलांचे पर्स चासपताना मिळुन आल्या.त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्यांना श्रीगोंदा बस स्टॅण्ड वरुन महीला पोलिसांचे मदतीने ताब्यात घेवुन त्यांना श्रीगोंदा पोलिस स्टेशनला आणुन विचारपुस केली असता, सुरवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर, त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता, त्यांनी त्यांची नावे ज्योती मधुकर रोकडे वय ३० वर्षे, आशाबाई मधुकर रोकडे वय ५५ वर्षे, दोघी रा.स्टेशनरोड राहुरी, ता.राहुरी जि.अहमदनगर असे असल्याचे सांगितले. तसेच, गुन्हा केल्याची कबुली देवुन, गुन्ह्यात चोरलेले सोन्याचे खालीलप्रमाणे दागिने कढुन दिले. एक सोन्याचे गंठन सुमारे अडीच तोळे वजनाचे, कानातील सोन्याचे टॉप्स जोड अर्धा तोळे वजनाचे, कानातील सोन्याचे वेल जोड अर्धा तोळे वजनाचे, दोन सोन्याच्या अंगठ्या सात ग्रॅम वजनाच्या असे एकुण ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने अंदाजे किंमत दोन लाख पन्नास हजार रुपये किंमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सदरची कामगिरी मनोज पाटील सो (पोलीस अधिक्षक अहमदनगर), सौरभकुमार अग्रवाल सो (अप्पर पोलीस अधिक्षक अहमदनगर), अण्णासाहेब जाधव, (उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग कर्जत) यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे रामराव ढिकले पोलीस (निरीक्षक श्रीगोंदा), (सपोनि) दिलीप तेजनकर, पोहेकॉ अंकुश ढवळे, पोकॉ प्रकाश मांडगे, पोकॉ दादा टाके, पोकॉ किरण बोराडे, पोकॉ संजय काळे, पोकॉ गोकुळ इंगवले, पोकॉ योगेश सुपेकर, मपोकॉ लता पुराणे, मपोकॉ गितांजली लाड यांनी केली आहे.

स्रोत:(श्रीगोंदा पोलिसांचे प्रसिद्धीपत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading