दिनांक १८ फेब्रुवारी, श्रीगोंदा:
बहुजन प्रतिपालक, रयतेचे राजे, युगपुरुष, कुळवाडीभूषण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संत शेख महंमद बाबा दर्गा प्रांगणात आयोजित ‘विचार प्रबोधन सप्ताहा’चा आज सातवा दिवस संपन्न झाला. या प्रबोधनामध्ये वारणानगर येथील दिनेश पाटील (अभ्यासक महाराजा सयाजीराव गायकवाड) यांनी प्रमुख वक्ते म्हणून, संबोधित केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे (जिल्हा परिषदेचे माजी सदस्य) अनिल ठवाळ, कार्यक्रमाचे उद्घाटक अमर बोराटे सर (सत्यशोधक विचार प्रचारक इंदापूर) व हभप बाळासाहेब धोत्रे महाराज (सत्यशोधक विचारांचे प्रचारक) हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रस्ताविक ऍड. संभाजीराव बोरुडे(आप्पा) यांनी केले. तर, सूत्रसंचालन मुकुंद सोनटक्के व संतोष इथापे यांनी केली.

नमूद सप्ताह यशस्वीतेसाठी बाप्पू माने, भीमा कोथिंबिरे, मुकुंदराव सोनटक्के, प्रदीप खामगळ, संतोष इथापे, मच्छिंद्र (काका) सुपेकर, अनिल ठवाळ, वामन (भाऊ) भदे, साहेबराव रासकर इत्यादिंनी प्रयत्न केले.
विचार मंचावर उपस्थित मान्यवरांपैकी प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना दिनेश पाटील यांनी बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांच्याबद्दल सविस्तर माहिती नमूद केली. याठिकाणी उपस्थितांना गायकवाड राजांबद्दल मत व्यक्त करत असतांना, दिनेश पाटील म्हणाले की, सयाजीराव गायकवाड महाराज हे देवाधर्माच्या व अंधश्रद्धेच्या अधीन नव्हते. त्यांनी आयुष्यामध्ये आपल्या संस्थानातुन एक रुपयांचीही देणगी कोणत्याही देवस्थानाला दिल्याचे संदर्भ मिळत नाहीत. मात्र, सयाजीराव गायकवाड महाराजांनी कोणत्याही धर्माचा द्वेष केला नाही. कोणत्याही धर्माला नाकारली नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी बोलताना पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य हे सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून, निर्माण केले होते. स्वराज्य निर्मितीसाठी वापरलेला सर्व संकल्पना सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या संस्थानात राज्यकारभार वापरल्या. महात्मा ज्योतिराव फुलें विषयी बोलतांना देखील फुले आणि सयाजीराव हे दोन्ही क्रांतिकारक होते. महात्मा फुलेंनी पाहिलेली सर्व स्वप्ने सयाजीराव महाराजांनी अस्तित्वात आणून दाखवली. शाहू महाराजांविषयी माहिती देतांना सांगितले की, वेदोक्त प्रकरणामध्ये शाहू महाराजांनी जेवढा संघर्ष केला. तेवढा संघर्ष अलीकडच्या कालखंडामध्ये कोणाच्या वाट्याला आला नसल्याचे, त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शाहू महाराजांना लाभलेल्या आयुष्यापेक्षा दहा-बारा वर्ष महाराज अजून जगू शकले असते. मात्र, वेदोक्त प्रकरनात त्यांची मोठ्या प्रमाणात शारीरिक हानी झाली. पुढे पाटील म्हणाले, पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हणतांना सयाजीराव महाराजांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. म्हणुन, यापुढे फुले, सयाजीराव, शाहू, आंबेडकर असा उल्लेख करण्याचे सर्वांना आवाहन केले.
याप्रसंगी आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये हभप बाळासाहेब धोत्रे महाराजांनीही फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा संदर्भात मार्मिक विचार मांडले. स्वतः बाळासाहेब धोत्रे महाराज हे सत्यशोधकी असल्याने तेच सबंद जिल्हा राज्यभर या पुरोगामी चळवळीचा इतिहास सांगतात, आजही त्यांनी या ठिकाणी उपस्थित श्रोत्यांना समतावादी चळवळी बद्दल माहिती दिली.
अमर बोराटे व अनिल ठवाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वांना कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. उद्या होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रम व सांगता समारंभासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे बोराटे, ठवाळ यांनी उपस्थितांना आवाहन केले.
या कार्यक्रमामध्ये ऍड. संभाजीराव बोरुडे, संतोष इथापे, बाप्पू माने, मुकुंद सोनटक्के, प्रदीप खामगळ, सतीश मखरे, ऍड. महेश लोणकर, भीमा कोथिंबिरे, अरविंद कापसे, नाना शिंदे, सुरज शिंदे, अमीन भाई शेख, राजू शेख, अजीज शेख सह बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.
स्त्रोत:(दिनांक १८ फेब्रुवारी २१ रोजी आयोजित विचार प्रबोधन कार्यक्रम)
