# श्रीगोंदा..सासऱ्याचा सुनेवर अत्याचार..! संतापजनक..

दिनांक १८ फेब्रुवारी, श्रीगोंदा:

तालुक्याच्या पश्चिम मेकडील एका गावात सासऱ्याने सुनेवर अत्याचार केल्याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीगोंदा तालुक्यात नात्याला काळिमा फासणारी ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शिरूर तालुक्याच्या सीमेलगत एका गावामध्ये १० फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते ३ च्या दरम्यान सुन घरात झोपली असताना, सासऱ्याने घरात प्रवेश करून घराचा दरवाजा आतून बंद केला. सुनेच्या जवळ जाऊन वाईट हेतूने सुनेच्या अंगाला हात लावून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळी सुनेने प्रतिकार केला. मात्र, तिचा प्रतिकार मोडीत काढत सासऱ्याने सुनेच्या अंगावर बसून तोंड दाबले आणि ‘ तू कोणालाही आवाज देऊ नकोस . तुझ्या मदतीला कोणीही येणार नाही ‘असे म्हणत तिची इच्छा नसताना तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दरवाजा उघडून बाहेर जाताना सुनेला सासरा म्हटला की ‘झालेला प्रकार जर तू कोणाला सांगितला ? तर, तुला व तुझ्या आई, वडिलांना जिवंत मारून टाकीन. ‘अशी धमकी दिली. त्यामुळे पीडित महिला घाबरली व झालेला प्रकार कोणालाही सांगितला नाही.

परंतु,या दुर्घटनेनंतर पीडित महिलेला मानसिक त्रास होऊ लागल्याने, दिनांक १६ फेब्रुवारी रोजी तिने घडलेला सर्व प्रकार सासू व नंदावा यांना सांगितला.मात्र, त्यांनीही झालेला प्रकार कोणाला सांगू नको. आमच्या घराण्याची अब्रू घालवू नकोस. आमची बदनामी करू नकोस ‘असे खडसावले. याप्रकरणी त्यांनी सर्वांनी सासऱ्यास मदत केली. यानंतर सुनेच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात सासऱ्याच्या विरोधात भादंवि कलम ३७६, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, सासू व नंदावा यांच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सासऱ्यास पोलिसांनी अटक केली असून, नमूद प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश बोराडे हे करत आहेत.

स्रोत:(पत्रकार दादासाहेब सोनवणे)

Leave a Reply