दिनांक १८ फेब्रुवारी (पेडगाव,श्रीगोंदा):
तालुक्यातील पेडगाव येथील एसबीआय एटीएमच्या समोर असलेल्या झाडावर वास्तव्यास असणाऱ्या प्रवासी पक्षांमधील करड्या रंगाचे बगळे व इतर काही असे साधारण पन्नास पक्षी मधमाश्यांच्या चाव्यामुळे मृत्यू पावल्याची घटना प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, काल दिनांक १७ फेब्रुवारी रोजी दुपारी एसबीआय एटीएम पेडगावच्या समोर असलेल्या झाडावर रोज वास्तव्यास असणाऱ्या प्रवासी पक्षांवर येथील मधमाशां काहीतरी कारणाने उठल्या आणि एकच हडकंप माजला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार उठलेल्या मधमाशा या पक्षांना डंक मारू लागल्या तसे, एकएक पक्षी झाडावरून खाली पडू लागला. असे साधारण ५० पक्षी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडल्याचे समजते आहे. आसपासच्या लोक वस्थेतील लोकांनाही या मधमाशा चावल्याचे बोलले जात आहे. याबाबत स्थानिकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवले होते. मात्र, याबाबत उशिरा माहिती मिळाल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
स्त्रोत:(लक्ष्मीकांत शिर्के, पेडगाव)
