#श्रीगोंदा.. ‘विचार प्रबोधन सप्ताहा’च्या सहाव्या दिवशी प्रशांत खामकर सरांचे व्याख्यान संपन्न..

दिनांक १७ फेब्रुवारी,श्रीगोंदा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विचार प्रबोधन सप्ताहाचा आज सहावा दिवस. यानिमित्ताने कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते प्रशांत खामकर सर (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बहिस्थ वक्ता) तसेच, अध्यक्ष म्हणून, संतोष विरकर (फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसारक औरंगाबाद) तर, प्रमुख पाहुणे ऍड. अरुण जाधव हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. संभाजीराव बोरुडे यांनी केले. तर, सूत्रसंचालन संतोष इथापे व मुकुंद सोनटक्के यांनी केले.

आपल्या प्रमुख भाषणात बोलताना प्रशांत खामकर सर म्हणाले की, सबंध महामानवानीं अतिशय खडतर पद्धतीने आपला चळवळीचा वसा सांभाळलेला आहे. तत्कालीन परिस्थितीमध्ये अनेक संघर्षांना सामोरे जात, मानवतावादी विचार रुजविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे. सकाळी येणाऱ्या वासुदेवाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जनकल्याणाचे राज्य कसे होते याबाबत गीतातून प्रबोधन केले आहे. त्याच्या गीतामध्ये शिवाजी राजाचा उल्लेख होतो. हा मोठा गौरवाचा विषय असल्याचे प्राध्यापक प्रशांत खामकर यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोफखाना, आरमार, संरक्षक त्यांचे एकमेव चित्र निर्माण करणारे चित्रकार व विश्वासाचे म्हणून मुस्लिम समाजाचे मावळे होते. रयतेचे राज्य निर्माण करत असतांना, त्यांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना एकत्रित जमऊन स्वराज्याची संकल्पना पूर्णत्वाला नेली. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असल्याचेही खामकरांनी नमूद केले. काही समाजकंटक लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ही धोक्याची बाब आहे. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तळागळात नेत समतावादी, मानवतावादी समाज निर्माण करण्याची गरज असल्याचे यावेळी सरांनी सांगितले. शेतकरी आणि कुणब्याच्या पोरांनी आता एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत मांडले. ते म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीसाठी शेतात काम करणारी शेतकऱ्याची पोर जमवली होती. आज ही आमच्या माता, भगिनी, स्त्रीया ‘इडा पिडा टळु दे ! बळीच राज्य येऊ दे’ ! असे म्हणतात. राज्य बळीचच आहे. मात्र, तो बळी कल्याणकारी होता. तर राजा छत्रपती हा सामर्थ्यशाली बळी असल्याचे त्यांनी सांगितले. स्वराज्यामध्ये जर, कोणी आया-बहिणींची कदर करत नसेल ? तर, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज गंभीर स्वरूपाच्या शिक्षा देत होते. “नात्यांचे पदर जर स्वराज्याची कदर करत नसेल ? तर, असते पदर वेळीच कापले पाहिजेत. असे छत्रपती शिवाजी महाराज येथील सामान्यांना आपलेसे वाटत होते.

https://bit.ly/bspmycityshrigonda

यानंतर अध्यक्षीय भाषणामध्ये संतोष वीरकर(औरंगाबाद) यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यांनी महामानवांचा इतिहास उघडा करून सांगितला. तसेच, प्रमुख पाहुणे ऍड. अरुण जाधव यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत बोलतांना स्वराज्य निर्मितीमध्ये सर्वसाधारण भटक्या विमुक्त समाजाचाही मोठा वाटा असल्याचे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महापुरुषांचा जीवन प्रवास व त्यांच्या समर्पित वृत्तीचा उल्लेख केला.

यावेळी राजेश इंगळे सरांनी राज्यातील शंभर किल्ल्यांवर यशस्वी ट्रेकिंग केल्यामुळे त्यांचा संयोजक, आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच, त्यांना या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणूनही नेमण्यात आले.

या कार्यक्रमासाठी ऍड. संभाजी बोरुडे, भीमा कोथिंबिरे, कपिल फुलारे सर, (नगरसेवक) सतीश मखरे, ऍड. महेश लोणकर, संभाजी ब्रिगेडचे अरविंद कापसे, नाना शिंदे, सुरज शिंदे, रफिक भाई इनामदार, आमीन भाई शेख, राजू शेख, अजीज शेख, बाप्पू माने, मुकुंद सोनटक्के, संतोष इथापे, बबन आळेकर, इरफान शेख, भाऊ राजपूत, सौ.मीना घोडके, प्राध्यापक रेश्मा घोडके सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात सामाजिक अंतर ठेऊन, सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले. कोरोना प्रादुर्भाव व सुरक्षा घेण्याबाबत येथे सूचना करण्यात आल्या.

स्त्रोत :(दिनांक १७ फेब्रुवारी 21 रोजी शेख महंमद बाबा यांच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रम)

Leave a Reply