दिनांक १७ फेब्रुवारी, श्रीगोंदा:
श्रीगोंदा ते कोळगाव रस्स्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी बांधकाम विभागाचे उप अभियंता अंपलकर यांना ad. रमेश जठार, ad. संदीप भोईटे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद उजगरे, उत्तम पवार, तुषार पवार, भागवत व्यवहारे आदींनी निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, श्रीगोंदा ते कोळगाव या ठिकाणी अनेक लोक कामानिमित्त ये जा करतात. श्रीगोंदा ते ढोरजा व पुढे कोळगाव या रस्त्यावर भानगाव ते ढोरजा रोड भिकारी माळ ते कोळगाव पर्यंत रस्ता पूर्णपणे खड्डे पडून प्रवासी वाहतूकिस खराब झालेला आहे. तो रस्ता प्रवास करण्या लायक राहिलेला नाही. सदर रस्त्यावर अपघात होऊन जीवित हानी होऊ शकते. तरी रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा. जर सदरचा रस्ता दुरुस्त झाला नाही. तर, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. असे निवेदन ad. रमेश जठार, ad. संदीप भोईटे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद उजगरे, उत्तम पवार, तुषार पवार, भागवत व्यवहारे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.
स्रोत:(प्रमोद उजगरे यांनी प्रसिद्धीस दिलेले निवेदन)
