दिनांक १९ फेब्रुवारी, श्रीगोंदा:
आज शहरातील जोधपूर मारुती चौक या ठिकाणी शिवजयंती महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून उस्ताहात पार पडली. याप्रसंगी तहसीलदार प्रदीप पवार तसेच पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाप्रसंगी नगराध्यक्ष सौ. शुभांगी ताई पोटे, उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे व आजी माजी नगरसेवक मंडळी उपस्थित होते. या ठिकाणी कु. पूर्वा युवराज रणसिंग या मुलीचे भाषण झाले. शिवप्रेमींनी श्रीगोंदा शहरांमधून कोरोनाचे सर्व नियम पाळून पालखी सोहळा पार पाडला. पालखी सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे.

महाराजांच्या पालखीचे प्रस्थान जोधपुर मारुती ते झेंडा चौक तसेच अण्णाभाऊ साठे चौक तसेच मेन रोड होळी गल्ली मार्गे रोकडोबा चौक पुढे रोहिदास चौकातून पुढे शिवाजी चौक ते शनि चौक शनिचौक या ठिकाणी पालखीची सांगता झाली.
या पालखीचे आयोजन कुळवाडीभूषण, शिवछत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती तसेच महासम्राट बळीराजा फाउंडेशन श्रीगोंदा यांनी केले होते. यावेळेस त्रिदल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टंसिंग ठेवून यामध्ये भाग घेतला. या पालखीचे स्वागत बगाडे ज्वेलर्स, जलाराम मशनरी तसेच झेंडा चौक येथील मुस्लीम बांधवांनी नाश्ता चहापाणी करून केले. तसेच पुढे अण्णाभाऊ साठे चौक याठिकाणी बौद्ध बांधव, मातंग बांधवांनी पालखीचे स्वागत करून, केळी वाटप केले. बुरुड गल्ली सुरुवातीला अनिकेत शिंदे मित्र मंडळ यांनी पालखीवर पुष्पवृष्टी व केली. रोहिदास चौक या ठिकाणी नाना लांडे मित्र मंडळ, आमले पाटील मित्र मंडळांनी फुलांचा वर्षाव केला. पुढे जामा मजीत याठिकाणी चहापाणी झाले. तसेच, शिवाजी चौक या ठिकाणी शिवसेनेचे बाळासाहेब दुतारे यांच्या टीमने महाराजांच्या पालखीचे स्वागत केले. पुढे रविवार पेठमध्ये नगरसेविका क्षीरसागर ताई यांनी महाराजांना पुष्पहार अर्पण करून, पालखीचे स्वागत केले. शनिचौकात पालखीची सांगता झाली.
हिंदू मुस्लिम ऐक्या सह बहुजन समाजाने या पालखीचे जंगी स्वागत केले. या पालखी समवेत त्रिदल अकॅडमीचे खामकर सर, भैया शेलार, रुपेश काळेवाघ, संदीप उमाप, भाऊसाहेब गोरे, संतोष शिंदे, नाना सोनवणे, हरिभाऊ काळे, चंद्रकांत भाऊ धोत्रे, डॉ.नवीन यादव, संतोष तात्या खेतमाळीस, गोरख तात्या घोडके, शिवाजी आप्पा घोडके, अक्षय अनभुले, सुनीलराव ढवळे, गणेश पारे, नाना शिंदे, अरविंद कापसे, सुरज घोडके, मयूर क्षीरसागर, प्रवीण धुमाळ, सागर हिरडे, मयूर आढाव, सुरज शिंदे, मंगेश लोखंडे, अनिकेत धुमाळ, गणेश ससाने आदी मान्यवर उपस्थित होते.
स्रोत:(नानासाहेब शिंदे,संभाजी ब्रिगेड, श्रीगोंदा)
