श्रीगोंदा बेलवंडीत रक्तदानाने शहीद जवानांना सलाम.

दिनांक १६ जानेवारी २०२४, श्रीगोंदा:

भारतीय सैन्य दलाचे औचित्य साधून अग्नीपंख फौंडेशनने श्रीगोंदा व बेलवंडी रक्तदान शिबीर घेऊन शहीद जवानांना सलाम उपक्रम राबविला. या शिबीरात ८७ जणांनी रक्तदान केले. श्रीगोंदा शहरात वीरमाता वीरपत्नी यांचे हस्ते तर, बेलवंडीत सरपंच ऋषिकेश शेलार व उत्तम डाके यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी वीरमाता नर्मदाबाई गिरमकर म्हणाल्या की, अग्नीपंख फौंडेशनने रक्तदान शिबिर आयोजीत करुन शहीद जवानांना मानवंदना दिली. खुप समाधान वाटले. पुढील वर्षीशी हे शिबीर घ्यावे.

शिबीर यशस्वी होण्यासाठी बेलवंडी ट्रेकर्स फाऊंडेशन, श्री स्वयंभू युवा प्रतिष्ठाण, शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन, मुरलीधर रक्तदाता ग्रुप श्रीगोंदा, आजी/माजी सैनीक संघटना व केमिस्ट असोशिएशनच्या सदस्यांनी विशेष मदत केली. आभार नवनाथ खामकर यांनी मानले.

फोटो:(रक्तदान शिबीर बेलवंडी)

स्त्रोत:(अग्निपंख फाऊंडेशन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading