समता सैनिक दल काळाची गरज : मेजर आठवले.

दिनांक २० डिसेंबर.श्रीगोंदा:

श्रीगोंदा समता सैनिक दल ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक मेजर बाळासाहेब आठवले यांनी प्रतिपादन केले. कोकणगाव या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा श्रीगोंदा तालुका व पंचशील तरुण मंडळ कोकणगाव आयोजित समता सैनिक दल निवासी शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष राजू ओहोळ होते.

ते पुढे म्हणाले, समता सैनिक यांची स्थापना २० मार्च १९२७ रोजी महाड सत्याग्रहाच्या वेळी झाली. समाजावर होणारे अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी व समस्त भारतीय देशांमध्ये समता निर्माण करण्यासाठी या दलाची निर्मिती केली आहे .या शिबिरामध्ये प्रत्येक सैनिकाला सैनिकी शिक्षण लाठीकाठी प्रशिक्षण, शारीरिक व्यायाम इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाते.तरी या शिबिराचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी केंद्रीय शिक्षक व डिव्हिजनल ऑफिसर डी एस कांबळे,दादाभाऊ पंडित,भारत अल्हाट,पंडित कांबळे, आबासाहेब रजपूत, राहुल झेंडे, पत्रकार अमोल झेंडे, झेंडे सर, राहुल रजपूत, दीपक रजपूत, नाथा रजपूत, चंदु रजपूत, शशिकांत रजपूत, सचिन रजपूत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरांमध्ये एकूण २८ शिबिरार्थींनी सहभाग नोंदवला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ रामफळे यांनी केले. प्रास्तविक सतीश ओहोळ यांनी केले व आभार आबासाहेब राजपूत यांनी मानले.

स्रोत:(प्रसिद्धीपत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading