२४ तासात श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात उभारले सॅनिटायजेशन टनेल…

दिनांक ९ एप्रिल,श्रीगोंदा:

शहरातील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर आणि रुग्णाच्या आरोग्याची काळजी घेत पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव,हॉटेल सिद्धीचे संचालक पत्रकार मच्छिंद्र सुद्रीक,बाजार समिती संचालक सतिष पोखरणा,दक्षचे दत्ता जगताप,दिगंबर भदे यांनी २४ तासाच्या आत उभारले सॅनिटायजेशन टनेल…

याबाबत अधिक माहिती अशी की,
ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर नवीन यादव यांनी ग्रामीण रुग्णालयात सॅनेटायजेशन टनेलची गरज असल्याचे सोशलमीडियावर सांगताच पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी लागलीच तीन हजार रुपये देण्याचे जाहीर केले. ती पोस्ट पाहताच हॉटेल सिद्धीचे संचालक पत्रकार मच्छिंद्र सुद्रीक यांनी उर्वरित सर्व मदत करण्याचे जाहीर केले. दक्षचे दत्ता जगताप यांच्या मदतीने सर्व साहित्य घेऊन टनेल उभारण्याचे काम चालू असतानाच बाजार समिती संचालक सतिष पोखरणा,दिगंबर भदे यांनी खर्चात हातभार लावण्याचे ठरवले आणि २४ तासात ग्रामीण रुग्णालया समोर टनेल उभे राहिले.

यावेळी बोलताना बाजार समिती संचालक सतिषशेठ पोखरणा म्हणाले,कोरोनाचा मुकाबला करताना डॉक्टर, नर्स, इतर स्टाफला अडचणी येऊ शकतात.त्यांच्या सुरक्षेसाठी सॅनिटायजेशन टनेलची आवश्यकता आहे. म्हणून,पोलीस निरीक्षक व पत्रकार सूद्रिक यांच्या कृतीनंतर या टनेल उभारणीसाठी मदत देण्याचा निर्णय घेतला. तसेच,आरोग्य कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप केले.
तर,पत्रकार मच्छिंद्र सुद्रीक यांनी डॉक्टर यादव यांनी पोस्ट लिहिली की,सॅनेटायजेशन टनेल उभारले पाहिजे. आरोग्य कर्मचारी जीवावर उदार होऊन काम करत आहेत.त्यांना सॅनेटायजेशन टनेल उभारणीसाठी प्रयत्न केले पाहिजे.या हेतूने आम्ही एकत्र येत सदर टनेल उभारले.

यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. राजुळे, डॉ. नवीन यादव, डॉ. थोरात सह कर्मचारी रुग्णांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading