संतोष इथापे यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये  प्रवेश.

दिनांक १० मे २०२४, श्रीगोंदा:

अक्षयतृतीयाच्या शुभमुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री जयंत पाटील, नगर दाक्षिणचे महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकप्रिय उमेदवार लोकनेते श्री निलेशजी लंके, जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्रजी तात्या फाळके यांच्या प्रमुख उपस्थीतीमध्ये बारामती लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळेयांच्या हस्ते श्रीगोंदा तालूक्यातील तसेच, शहरातील विविध प्रश्नांवर आवाज उठवणारे राजकीय सामाजीक कार्यकर्ते श्री संतोष इथापे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षा मध्ये शेवगाव येथे प्रवेश केला आहे.

याबाबत प्रसिध्दी पत्रात नमूद केलेली माहिती अशी की, भारतीय जनता पक्षाने या देशातील जनतेला विविध प्रकारची रंजक स्वप्न दाखऊन सत्ता प्राप्त केली. परंतू, मागील दहा वर्षाच्या काळात जनतेवर महागाईचा मोठा बोजा टाकला, शेतकऱ्यांसाठी दिलेल्या आश्वासनांची पुर्तता तर सोडाच, त्यांची कूचेष्ठा केली आहे. महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची मोडतोड करून, दडपशाहीच्या माध्यमातुन सत्ता प्राप्तीसाठी राजकीय स्वैराच्यार करत असताना, महाराष्ट्राच्या सह्याद्रिप्रमाणे ताठ मानेणे ८४ वर्षाचा संघर्ष योद्धा महाराष्ट्रासाठी या देशासाठी आहोरात्र कष्ट घेत सत्तांध सत्ताधाऱ्यांचे मनसुबे धुळीस मिळवत आहेत.

शेतकऱ्यांच्या, बेरोजगार तरुणांच्या, माहिलांच्या, प्रत्येक समाज घटकांचे प्रश्न अभ्यासपूर्ण संसदेत मांडणाऱ्या सुप्रियाताईंना अनेकदा संसदरत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांनी व पवार साहेबांनी बारामतीच्या विकासातुन राज्यासाठी व देशासाठी आदर्श निर्माण केला आहे. छत्रपती शिवराय व शिवपुत्र संभाजी महाराजांच्या संस्कारांना घराघरात पोहचवणारे व उत्कृष्ठ वकृत्वातुन संसदेत अनेक लोकहिताचे, शेतकरी हीताचे प्रश्न मांडताना मोदी सरकारच्या जाचक धोरणांचा कडक विरोध करणारे डॉ.अमोल कोल्हे अडचणीच्या काळात धीरोदात्तपणे संयमाने शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर मजबूतीने उभे राहणारे आद. प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील, आमदार रोहित दादा पवार व जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी फाळके हे राजकारणात वावरणाऱ्यांसाठी  प्रेरणादाई नेते आहेत. या नेत्यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शनाने चांगले कार्य करता येणार असल्याचे व त्यासाठी पक्षाच्या स्थानिक सर्व नेत्यांचे कार्यकर्त्यांची मोलाची मदत मिळत राहील असे श्री संतोष इथापे यांनी सांगीतले.

श्री संतोष इथापे व श्री निलेशजी लंके यांनी पुर्वी शिवसेना पक्षामध्ये काम केलेले आहे. लोकांप्रती त्यांच्या सर्व समस्याची सोडवणुक करण्यासाठी तसेच गोरीबांचे आरोग्यदूत म्हणून लंकेसाहेबांनी सातत्यपुर्ण गेली कित्येक वर्ष कार्य केले. हे केलेले कार्य संपुर्ण महाराष्ट्राला प्रेराणादाई आहे. नगर दाक्षिणेतुन त्यांचा मोठया मताधिक्याने विजय होणार आहे. त्याचा विश्वासू सहकारी म्हणून, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी पक्षाची धेय धोरणानुसार पुढील काळात काम करताना सर्व समांन्य नागरीक, शेतकरी, गरजवंत रूग्णांना, पिडीतांना मदतीचा हात देऊन, त्यांच्या हिताचे कार्य करत राहाणार असलेचे संतोष इथापे यांनी सांगीतले .

पक्ष प्रवेशासाठी माजी आमदार श्री राहूल दादा जगताप, पक्षाचे तालूकाध्यक्ष श्री हरिदास आबा शिर्के व संतोष इथापे मित्र मंडळींनी हार्दीक हार्दीक सदिच्छा दिलेल्या आहेत.

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading