दिनांक २३ जुन २०२४,श्रीगोंदा:
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय, श्रीगोंदा येथे जागतिक योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्र.प्राचार्य डॉ. महादेव जरे यांनी योगसाधनेचे महत्त्व विशद केले. त्यांनी सांगितले की, योग हे शरीर, मन, भावना, आणि संकल्प यांचे नियमन करण्याचे साधन आहे आणि आजच्या काळात शरीर व मन सुदृढ ठेवण्यासाठी योगसाधना आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख योगगुरू प्रा. सुनील टकले यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने शिकवली आणि त्यांच्या प्रात्यक्षिके करून घेतली. ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, उत्तानासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, भद्रासन, बद्धकोनासन, भुजंगासन, मकरासन, प्राणायाम आणि कपालभाती यांसारख्या आसनांचे प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आत्मसात केली.
या कार्यक्रमात महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. डॉ. प्रकाश साळवे, डॉ. सुदाम भुजबळ, प्रा. संजय अहिवळे, पर्यवेक्षक रत्नाकर झिटे, एन.सी.सी. ऑफिसर प्रा. रमेश थोरात, विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रमुख प्रा. किरण ढवळे, क्रीडाशिक्षक प्रा. संजय डफळ, आणि महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शारीरिक शिक्षण संचालिका प्रा. कल्पना बागुल यांनी केले. क्रीडा विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी कल्याण मंडळ, आणि एन. सी. सी. विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उपप्राचार्य प्रा. शहाजी मखरे यांनी सर्वांचे आभार मानले.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)



