दिनांक १३ नोव्हेंबर २०१४,श्रीगोंदा:
आज, १३ नोव्हेंबर २०२४ रोजी, श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील मतदान अधिकारी आणि कर्मचार्यांचे द्वितीय प्रशिक्षण महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय, श्रीगोंदा येथे आयोजित करण्यात आले.
या प्रशिक्षणास निवडणूक निरीक्षक मा. डी. रत्ना मॅडम यांनी भेट दिली. निरीक्षक मॅडम यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थी यांना निवडणूक प्रक्रियेसाठी ‘You should be systematic’ हा दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले व निवडणूक आयोगाने ठरवलेल्या प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले.
प्रशिक्षण दरम्यान, निरीक्षक मॅडम यांनी निवडणुकी संदर्भातील कोणत्याही चूक टाळावी असे सूचित केले. निवडणूक प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी हँडसऑन ट्रेनिंग आणि प्रशिक्षणाच्या सर्व बाबींची माहिती व्यवस्थित घेण्याचे त्यांनी सांगितले.
प्रशिक्षणास अपर जिल्हाधिकारी शिर्डी मा. श्री. कोळेकर आणि छत्रपती संभाजीनगर येथील कार्यकारी अभियंता अरुण कटाळे यांनीही भेट दिली. मा. कोळेकर साहेबांनी मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या पूर्वसंध्येला आवश्यक बाबींची सविस्तर माहिती दिली. मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांनी टीम म्हणून काम करण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली व नमुना १७ क, नमुना १७ अ, तसेच केंद्राध्यक्ष दैनंदिनी व्यवस्थित भरण्याचे मार्गदर्शन दिले.

प्रशिक्षणात ईव्हीएम मशीनचा सखोल अभ्यास करण्यात आला. ईव्हीएमच्या वापरातील संभाव्य अडचणींविषयी प्रशिक्षणार्थींना सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी २२६ श्रीगोंदा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भूसंपादन १५ मा. गौरी सावंत, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीगोंदा डॉ. क्षितिजा वाघमारे, परिविक्षाधीन तहसीलदार प्रवीण मुदगुल, आणि निवडणूक नायब तहसीलदार पंकज नेवसे उपस्थित होते.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)




