विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी नागवडे यांना संधी द्या…. युवा नेते प्रतिक लगड..

दिनांक १३ नोव्हेंबर २०२४,कोळगाव, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यामध्ये आजपर्यंत फक्त आश्वासनांचा पाऊस पडला असून विकास कामे मात्र जागेवरच आहेत. फिरती एमआयडीसी स्थिर करण्यासाठी आणि विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी अनुराधा नागवडे यांना आपण साथ द्यावी असे आवाहन कोळगाव मधील युवा नेते व सुजल इंटरप्राईजेस चे उद्योजक प्रतिक लगड यांनी काळे वस्ती आणि उजागरे वस्ती येथील घोंगडी बैठक मध्ये व्यक्त केले.

कोळगाव येथील काळे वस्ती आणि उजगरे वस्ती येथील तरुणांसमोर बोलताना प्रत्येक लगड यांनी सांगितले की, श्रीगोंदा तालुक्यामध्ये अनेक विकासाची कामे प्रलंबित आहेत. त्यामध्ये साकळाईचा प्रश्न, बेरोजगारांचा प्रश्न, एमआयडीसीचा प्रश्न, मूलभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण असे अनेक प्रश्न प्रलंबित असताना आजपर्यंत फक्त आश्वासनेच देण्यात आली. परंतु कार्यवाही न झाल्याने गेल्या ३० ते ३५ वर्षापासून प्रश्न जैसे तेच आहेत. समस्या सुटलेल्या नाहीत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत जे ठामपणे बोलल्याप्रमाणे करतील अशा अनुराधा नागवडे यांना आपण साथ द्यावी असे आवाहन केले.

यावेळी, उजगरे वस्तीतील अक्षय, श्रीकांत, विकास, सनी, बबलू , राजेश, वैभव, निलेश उजगरे उपस्थित होते. तर, काळे वस्ती मधील शरद, आदिनाथ, सौरभ, अमोल, अमित, दीपक, आदित्य काळे, किशोर सकट असे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

स्रोत:(पत्रकार महेश शिंदे)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading