उद्या श्रीगोंद्यात महाविकास आघाडी उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा..

दिनांक १३ नोव्हेंबर २०२४,श्रीगोंदा:-

राज्यातच नव्हे तर देशात विरोधी पक्षाच्या आघाडीत बुलंद तोफ म्हणून ओळखले जाणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महा विकास आघाडी उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांच्या प्रचारार्थ गुरुवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ रोजी श्रीगोंदा शहरातील शेख महंमद महाराज पटांगण मध्ये दुपारी १२:०० वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात असल्याची माहिती सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना व्हॉईस चेअरमन बाबासाहेब भोस ,शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांनी दिली.

यावेळी खासदार फौजिया खान, शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, शेख सुभान अली उपस्थित राहणार असून कार्यकर्ते, जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना चेअरमन राजेंद्र नागवडे आदींनी केले आहे.

माजी मुख्यमंत्री उबाठा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच श्रीगोंदा तालुक्यात येत असून मुख्यमंत्री म्हणून केलेले कार्य आणि गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारशी केलेला सामना यामुळे येथील मतदारांत उत्सुकता असून, गर्दीचा उच्चांक मोडण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading