दिनांक १६ मार्च २०२५,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील हॉटेल शिवराज परमिट अँड बिअर बार येथे दिनांक १७ जानेवारी २०२५ रोजी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेबाबत अद्याप अनोळखी इसमांचा शोध लागलेला नाही. श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल असून, पोलिसांनी संबंधित व्यक्तींबाबत माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

फिर्यादी सुभाष जयसिंग पाचपुते (वय ५१, व्यवसाय-खाजगी नोकरी, रासाईनगर, काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हॉटेल शिवराज येथे आरोपी व साक्षीदार यांच्यात भांडण झाल्यानंतर, आरोपींनी आपल्या जवळील गावठी पिस्तुलातून समोरील अनोळखी इसमांवर गोळीबार केला. मात्र, या घटनेतील जखमी इसमांचा शोध अद्याप लागलेला नाही. तसेच त्यांचे नाव, पत्ता किंवा ठावठिकाण्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही.

श्रीगोंदा पोलीस तपासात असून, ज्या कोणाकडे या गोळीबारात जखमी झालेल्या इसमांविषयी माहिती असेल किंवा संबंधित फोटो ओळखू येत असल्यास, त्यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. माहिती देण्यासाठी पुढील नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे –
- पोलीस निरीक्षक किरण शिंदे:
- ८३२९००८३०२
- पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर:
- ९६२३४४३०५६

या प्रकरणातील आरोपींचा तपास सुरू असून, पोलिसांकडून गुन्हेगारांना पकडण्यासाठी विविध पातळ्यांवर शोधमोहीम राबवली जात आहे. नागरिकांनी या संदर्भात कोणतीही महत्त्वाची माहिती असेल तर तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)


Advertise..
