अल्पवयीन खेळाडू मुलीवर लैंगिक अत्याचार; मास्टरमाइंडसह तिघांना अटक, बहुजन समता पार्टीचा पाठपुरावा..

दिनांक ११ जुन २०२५, अहिल्या नगर:

कर्जत तालुक्यातील मागासवर्गीय मातंग समाजातील १७ वर्षीय अल्पवयीन कबड्डी आणि कुस्ती खेळाडू मुलीला श्रीलंकेत खेळण्यासाठी नेण्याचे आणि २५ लाखांचे बक्षीस मिळवून देण्याचे तसेच पोलिसात मोठ्या पदावर नोकरी लावण्याचे खोटे आश्वासन देऊन फसवणूक आणि लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी रमेश गंगार्डे (राहणार: बहिरोबा वाडी, ता. कर्जत), शिवाजी वाबळे (राहणार: दहिगावणे, ता. शेवगाव) आणि अंकुश भेंडेकर यांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे..

बहुजन समता पार्टीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अनुसूचित जाती/जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा सविस्तर वृत्तांत या मुलीला रमेश गंगार्डे याने खोटी आश्वासने देऊन कर्जतहून नेवासा येथे शिवाजी वाबळे याच्याकडे पोहोचवले. कर्जत ते नेवासा प्रवासादरम्यान, रमेशने एका हॉटेलमध्ये मुलीचा नको असलेला वाढदिवस साजरा करण्याच्या नावाखाली कॉफी आणि स्टिंग शीतपेयात गुंगीचे औषध टाकून तसेच ब्रेडच्या स्लाइसवर टायगर बाम लावून तिच्यावर लैंगिक छळ केला.

त्यानंतर मुलीला शिवाजी वाबळे याच्याकडे सोपवण्यात आले. वाबळे याने आपल्या स्कॉर्पिओ गाडीतून (क्रमांक: MH16AT4203) मुलीला संभाजीनगरमार्गे भोपाळला नेले.

प्रवासादरम्यान आणि भोपाळ येथे सलग पाच दिवस तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. वाबळे याने मुलीला श्रीलंकेस CERN System: त खेळवायला नेण्याचे आश्वासन देऊन तिच्यावर अत्याचार केले आणि ती परदेशी खेळण्याच्या संधीपासून वंचित राहिली.

या प्रकरणात, अनुसूचित जाती/जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा १९८९ च्या कलम ३(२)(व्हीए)(आर) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस सहाय्यक आयुक्त हिंजवडी श्री. कुऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. सकट यांनी वाबळे यांच्यावर यापूर्वीही अशा प्रकारच्या अनेक मुलींचा छळ केल्याचा आरोप केला असून, त्याचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे.

या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून, बहुजन समता पार्टीने दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. याप्रकरणी पुढील तपास आणि कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्रोत:(फिर्याद)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading