दिनांक ११ मार्च २०२६ अहिल्यानगर:
एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवून, तिच्यावर सात वर्ष बलात्कार केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगरमध्ये समोर आली आहे.

याप्रकरणी रणजित मुकिंदा चव्हाण (रा. निमजेवाडी, श्रीगोंदा) या तरुणाविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कालावधी: मार्च २०१९ ते २६ फेब्रुवारी २०२६. ठिकाण: अहिल्यानगर-दौंड रस्त्यावरील बाबुर्डी बेंद शिवारातील एक हॉटेल.

रणजित याने पीडितेचा विश्वास संपादन करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिचे खासगी फोटो आणि व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच कुटुंबीयांना दाखवण्याची धमकी दिली. या भीतीपोटी त्याने वारंवार पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला.

पीडित महिलेने अखेर तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदवला असून, पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
