दिनांक २२ मे,(टाकळी लोणार,श्रीगोंदा):
टाकळी लोणार गावात क्वारंटाईन केंद्रात सावळा गोंधळ झाला आहे.बाहेर गावातून आलेल्या वक्तिनां १४ दिवसांसाठी क्वारंनटाईन करण्यात आलेले असून,असे एकुण ३५ जण ५ खोल्या मध्ये आहेत.
हे सर्व एकाच पाईपद्वारे पाणी वापरतात, बिगर मास्क,रुमाल न बांधताच एकमेकांशी गप्पा मारतात, शाळेत तसेच शाळेबाहेरच्या पटांगणात बिंधास्त फिरतात, विशेष करुन या सर्वांचे गावातील नातेवाईक सतत शाळेत जाऊन या लोकांच्या गाठी-भेटी घेतात, एकत्र जेवण करतात, गप्पा मारतात, मग नेमक या व्यक्तींना क्वारंटाइन का केलं आहे? असा प्रश्न गावात चर्चेचा विषय बनला आहेे .
शिवाय शाळे मध्ये संडास बाथरुम ची सोय नाही. अशा अवस्थेत महिला, मुली आसपास परिसरात शौचालयास बाहेर जात आहेत.रात्रीच्या वेळी बाहेर जाणे धोक्याचे ठरू शकते.तसेच पिण्याच्या पाण्याची सोय नाही, लाईटची सोय नाही, ग्रामसेवक, तलाठी व इतर सरकारी कर्मचारी यांचे या विलिगीकरण केंद्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याची माहिती संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी युवराज पळसकर व संदीप कुनगर यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
हे सर्व कर्मचारी दुसऱ्या तालुक्यातून रोज ये जा करतात,या संबधीतास विचारपुस केली असता उडवा-उडवीची उत्तरे मिळत आहेत. क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीच्या संपर्कात गावातील अनेक कुटुबांतील व्यक्ती आल्यामुळे गावात गोंधळ व घबराटीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे ही त्यांचे मतं आहे.
नमूद सर्व प्रकाराचा संभाजी ब्रिगेड टाकळी लोणार ने युवराज पळसकर व संदीप कुनगर च्या माध्यमातून जाहिर निषेध केला आहे.स्थानिक प्रशासनाने नमूद ठिकाणी तात्काळ कारवाई करीत सर्व प्रकार थांबवावा अशीही मागणी या माध्यमातून करण्यात येत आहे.
