दिनांक ५ ऑगस्ट,श्रीगोंदा/अहमदनगर:
शिवसेना उपनेते, माजी मंत्री व माजी आमदार अनिल राठोड (वय ७०) यांचे बुधवारी पहाटे ५:३० च्या सुमारास खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा विक्रम, ३ मुली, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी ११ वाजनेच्या आसपास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती श्रीगोंदयातील भैयांचे कार्यकर्ते नितीन रोही यांनी दिली असून, रोही यांनी दुखः व्यक्त करीत भावपूर्ण आदरांजली अर्पण केली आहे.
अनिल राठोड यांना काही दिवसांपूर्वी त्रास होऊ लागल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.
नगर जिल्ह्यात शिवसेनेची ओळख अनिल भैय्या यांच्या नावाने होती. जिल्ह्यात शिवसेनेच्या जडणघडणीत अनिल भैय्यांचा मोठा वाटा होता. अनिल राठोड ‘भैय्या’ नावाने सर्वत्र प्रसिद्ध होत. भैय्या हे सलग ५ वेळा नगर शहर मतदार संघाचे आमदार व काही काळ मंत्री देखील होते.
स्रोत:(नितीन रोही यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)
