दिनांक २९ ऑक्टोबर, श्रीगोंदा:
अतिवृष्टीमुळे तालुक्यातील चोराचीवाडी येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. स्थानिक प्रशासनामार्फत शेजारील पेडगाव, अधोरेवाडी, शेडगाव, टाकळी कडेवळीत, चांडगाव या गावांतील शेती नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले आहेत.
याप्रमाणे मौजे चोराचीवाडी संयुक्त ग्रामपंचायत भिंगाण खालसा दु // या दोन्ही गावांचे पंचनामे झालेले नसुन, या गावांबरोबर तालुक्यातील सर्वच अतिवृष्टी झालेल्या गावांचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांनी दयावेत. अन्यथा, शिवसेनेच्या वतीने जनहितार्थ तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा संतोष शिंदे यांनी प्रशासनास दिलेल्या निवेदनात नमूद केला आहे.

यावेळी निवेदन देतांना संतोष शिंदे (शिवसेना तालुका उपप्रमुख व ग्रामपंचायत सरपंच चोराचीवाडी), (तालुका संघटक) नंदकुमार ताडे, बाळासाहेब दुतारे (जिल्हा उपप्रमुख युवा सेना), संतोष खेतमाळीस (शहर प्रमुख श्रीगोंदा), हरिभाऊ काळे (तालुका प्रमुख युवासेना), नाथा पवार (उप तालुकाप्रमुख युवा सेना श्रीगोंदा) सह शिवसेना व युवा सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते
स्त्रोत: संतोष शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती
