दिनांक ३० ऑक्टोबर(मांडवगण,श्रीगोंदा):
बोगस कान्दा बियाणे बेकायदेशीर पद्धतीने साठवणुक करणे, परस्पर एका खाजगी कंपनीच्या बॉक्समध्ये सीलबंद करुन विक्रीसाठी खाजगी विक्रेते व शेतकऱ्यांना वितरीत करणे , या गुन्हेगारी कृत्यामुळे मांडवगण ,ता.श्रीगोंदा येथुन अमोल प्रकाश धबागडे (मुळगाव- यवतमाळ,हल्ली मुक्काम-माडंवगण) या ईसमास श्रीगोंदा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

दि. २८/१०/२०२० रोजी मांडवगण, ता. श्रीगोंदा येथे कृषी विभाग व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या संयुक्त पथकाने छापा टाकून विराट ऐग्रो इनपुट,जालना या कंपनीच्या कान्दा बियाण्याचे ५०० ग्रैम वजनाचे ८० बॉक्स, ७० किग्रॅ सुट्टे कान्दा बियाणे, सिलीगं मशीन, प्लास्टिकच्या रिकाम्या पिशव्या ईत्यादी अन्दाजे रुपये ३.५ लक्ष रक्कमेचा माल जप्त करण्यात आला आहे.
बियाणे अधिनियम, १९६६ आणि बियाणे नियंत्रण आदेश, १९८३ या कायद्यानुसार ही कारवाई करण्यात अहमदनगरच्या कृषी विभागास यश मिळाले आहे. संबधीत बियाण्याचा नमुना काढुन बियाणे प्रयोगशाळा, पुणे येथे पाठवण्यात आला आहे.
ही कारवाई राजेश जानकर, मोहीम अधीकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करित आहेत.
शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे बियाणे हे केवळ, अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावे आणि त्यावेळी न विसरता परिपूर्ण बिल घ्यावे.
– श्री. राजेश जानकर, मोहिम अधीकारी, कृषी विभाग, अहमदनगर.
स्रोत:(पत्रकार शफीक हवालदार यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)
