ह.मोहम्मद पैगंबर(सं.) यांच्या जयंती निमित्त श्रीगोंदा तालुका मुस्लीम जमात व सहयोग फौंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन..

दिनांक ३० ऑक्टोबर,श्रीगोंदा:

ह. मोहम्मद पैगंबर (सं.) यांच्या जयंती निमित्त श्रीगोंदा तालुका मुस्लीम जमात व सहयोग फौंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन कररण्यात आले होते.

दरवर्षी ह.मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जयंती निमित्त श्रीगोंद्यात जुलुस सह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. परंतू, सध्या कोरोनोचा पार्दुभाव पाहता व पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देत, मुस्लीम समाजाच्या वतीने चालु वर्षी हे कार्यक्रम रद्द करण्यात आले.त्या एैवजी श्रीगोंदा येथील आनंद हॉस्पीटल येथे दि.३० ऑक्टोंबर रोजी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबीरात सुमारे १०० जणांनी रक्तदान केले.

कुराणमध्ये उल्लेख आहे “ज्याने एका मानवाचे प्राण वाचवले त्याने समस्त मानव जातीचे प्राण वाचविले.” या उद्देशाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच मुस्लीम समाजाच्या वतीने श्रीगोंदा ग्रामिण रुग्णालयात ऑक्सीजनसाठी बंद पाकीटात रोख रक्कम पोलीस निक्षिक दौलतराव जाधव यांच्या हस्ते डॉ.बांगर यांच्याकडे सुर्पुत करण्यात आली.यावेळी पो.नि.जाधव, जमील सर यांनी ह.मोहम्मद पैंगबर यांची माहिती सांगितली. तर, डॉ.बांगर यांनी रुग्णालयास ऑक्सीजनसाठी रोख स्वरुपात रक्कम दिल्याबद्दल सर्व मुस्लीम समाजाचे आभार मानले.यावेळी माजी उपनगराध्यक्ष अख्तर शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले.

https://play.google.com/store/apps/details?id=nxtgen.mycity

सध्याच्या कोरोना या काळामध्ये रक्ताचा तुटवडा भासत असल्याने या रक्तदान शिबीरात जमा झालेल्या रक्तचा उपयोग होणार असुन, सर्व गरजू रुग्णांना होईल.असे अर्पण ब्लड बँक अहमदनगर यांनी यावेळी सांगितले. या रक्तदान शिबिरास (नगराध्यक्ष) सौ.शुभांगीताई पोटे, (नगरसेवक) प्रशांत गोरे, बाळासाहेब शेलार, (पोलीस निरिक्षक) दोलतराव जाधव, (श्रीगोंदा तालुका आरोग्य अधिकारी) डॉ.खामकर, डॉ.अशोक खेंडके, डॉ.निलेश पाटील, डॉ.अविनाश जामदार, डॉ.अरुण रोडे, प्रा.दादासाहेब देशमुख यांनी भेट दिली. डॉ.इम्रान जमादार, डॉ.राज सय्यद, डॉ.मजहर सय्यद यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी नगरसेवक निसार बेपारी, अख्तरभाई शेख, (माजी नगरसवेक) शब्बीर बेपारी, अजिम जकाते, निसार हकीम, अजिजभाई शेख, नवाज शेख, इलाही मालजप्ते, Ad.इमरान इनामदार, मौलाना आतार, अब्दुल रहिम जकाते, जमीर जकाते, पत्रकार राजू शेख, पत्रकार शकिल शेख, मल्लू शेख, हाजी महेबुबभाई, जमील सर, इरफान बागवान, मुजाहीद मालजप्ते, मुन्ना मालजप्ते, जाकीर जकाते आदी उपस्थित होते.

स्रोत:(अख्तर शेख यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading