दिनांक २७ मार्च, श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरातील एका नामांकित महिलेचा एका विक्षिप्त इसमाने विनयभंग केला आहे. काल दिनांक २६ मार्च रोजी शहरातील यश हॉटेल समोर हा प्रकार घडला. महिलेला तिच्या चारित्र्य बाबत अश्लील बोलत, शिवीगाळ करून जातीवाचक बोलल्याने बंडू कोथिंबिरे या इसमावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास बंडू विश्वनाथ कोथिंबिरे, श्रीगोंदा याने नमूद महिलेस जातीवाचक शिवीगाळ, तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करुन तिला लज्जा उत्पन्न होईल, अशा पद्धतीने वर्तणूक केली. तिचा विनयभंग करून, लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत, जीवे ठार मारण्याची धमकी दिली. सदर घटना यश हॉटेल समोर झाली.
Shrigonda … A case of atrocity has been registered against the person who molested a woman …
याप्रकरणी महिलेने बंडू कोथिंबीरे विरुद्ध भादवि कलम ३२३, ३४१, ३५४, ३५४(अ), ५०४, ५०६ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अर्थात ऍट्रॉसिटीच्या ३(१) (डब्ल्यू) (आय), ३(२) (व्ही) (ए) व ३(१) (आर) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव हे करीत आहेत.
स्रोत:(फिर्याद)
